पर्यटकांच्या गर्दीने मुक्तिधाम परिसर गजबजला

पर्यटकांच्या गर्दीने मुक्तिधाम परिसर गजबजला

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

करोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून लावलेले निर्बंध शिथिल ( Corona Restrictions relaxed ) केल्याने मंदिरे खुली झाली असून स्थानिकांसह राज्यभरातून मोठ्या प्रमाणात पर्यटक (Tourist ) नाशिकरोड ( Nashikroad ) परिसरात दाखल झाले आहेत. प्रसिद्ध धार्मिक स्थळ म्हणून ओळख असलेला मुक्तिधाम ( Muktidham )परिसर पर्यटकांच्या गर्दीमुळे फुलला आहे.

येथील मुक्तिधाममध्ये दर्शनासाठी दरवर्षी हजारो भाविक भेट देतात. मात्र गेल्या दोन वर्षांपासून करोनाच्या प्रादुर्भावामुळे मंदिरे उघडण्यास बंदी होती. मात्र रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याने संपूर्ण राज्यात निर्बंध शिथिल करण्यात आल्याने आता भाविक व पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे दिसत असून परिसरातील व्यापार्‍यांच्या व्यवसायात वाढ होत आहे.

नाशिक शहर हे धार्मिक क्षेत्र म्हणून ओळखले जाते. त्र्यंबकेश्वर, रामकुंड, काळाराम मंदिर, तपोवन, सोमेश्वर या प्रसिद्ध धार्मिक स्थळांबरोबर येथील मुक्तिधाममध्ये दर्शनासाठी भाविक प्राधान्य देतात. संपूर्ण संगमरवर दगडात बांधकाम असलेले मुक्तिधाम म्हणजे बांधकामाचा एक सुंदर आविष्कार असल्याने भाविक येथे आल्यानंतर जास्त वेळ देऊन दर्शनाचा आनंद घेतात. त्यानंतर अनेक भाविक शिर्डी येथील साईबाबा मंदिरात दर्शनासाठी रवाना होतात. तसेच शिर्डीकडून येणारे भाविक मुक्तिधामचे दर्शन घेतल्याशिवाय पुढे जात नाहीत.

गेल्या दोन दिवसांपासून मुक्तिधाम व परिसर भाविक व पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेला असून रस्त्यावरील वाहतूक वाढली आहे. श्रीरामनवमीच्या पार्श्वभूमीवर परिसरातील व्यावसायिक, हॉटेल, लॉज, उद्याने आदी ठिकाणी हाऊसफुल्लचे बोर्ड लागल्याचे दिसून येत आहे. आर्थिक चलनवलन वाढल्याने लहान-मोठ्या व्यवसायिकांना दिलासा मिळत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

Related Stories

No stories found.