फाळके स्मारकात पर्यटकांची गर्दी; सुविधा देण्यास मनपा असमर्थ

फाळके स्मारकात पर्यटकांची गर्दी; सुविधा देण्यास मनपा असमर्थ

इंदिरानगर | किशोर चौधरी | Nashik

नाशिकच्या (nashik) वैभवात भर घालणारे, ऐतिहासिक महत्त्व असलेले व पर्यटकांच्या (Tourists) दृष्टीने आकर्षण असणारे पांडवलेने स्थित चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके स्मारक (Dadasaheb Phalke Memorial) उत्पन्न असूनही समस्यांच्या विळख्यात आहे.

अडीच वर्ष बंद राहूनही अद्याप पर्यंत या ठिकाणी अनेक सुविधा देण्यास मनपा प्रशासन (Municipality administration) असमर्थ ठरत आहे त्यामुळे येणाऱ्या पर्यटकांनी रोष व्यक्त करत असलेल्या सुविधा सुरू करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

कोरोना (corona) काळापासून फाळके स्मारक (Phalke Memorial) बंद होते मागील काही दिवसापासून स्मारक सुरू झालेले असले तरी या ठिकाणी असलेले वॉटर पार्क (Water park), मिनी थिएटर (Mini theater), दादासाहेब फाळकेंची माहिती असलेले संग्रहालय (Museum), हिरवे पिवळे, रंगबिरगी लाईट तसेच कारंजा (fountain) पूर्णपणे सुरू झालेले नाहीत खाद्यपदार्थांचे स्टॉल हे बंद आहेत त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड झाला.

दिवाळीच्या सुट्यामध्ये (Diwali holidays) या ठिकाणी अनेक पर्यटकांनी मोठी गर्दी ही केली त्याचे मोठे उत्पन्नही मनपाला मिळाले परंतु मात्र ज्या अपेक्षाणी पर्यटक (tourists) या ठिकाणी आले होते त्याचा लाभ त्यांना मिळू शकला नाही. अडीच वर्षाच्या कालावधीनंतर मिळालेल्या सुट्टीचा आनंद उपभोपण्यासाठी बाहेरून आलेल्या पर्यटकांनी वॉटर पार्क, संगीतमय असलेले कारंजे पाहण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी गर्दी केली होती.

उत्पन्नात वाढ होऊन ही येथील सर्वांचे आवडते वाटर पार्क, संगीतमय कारंजे, तसेच चित्रपट सृष्टीचे जनक असलेल्या दादासाहेब फाळके यांच्या संग्रहालयातून त्यांच्या कार्याची व त्यांनी काढलेल्या चित्रपटाची माहिती पर्यटकांना प्राप्त होऊ शकली नाही मागील कालावधी पेक्षा पर्यटकांचा ओघ या वेळेला वाढल्याचे या ठिकाणी असलेले अधिकारी डी पी राठोड यांनी सांगितले.

या ठिकाणी त्यांच्या देखरेखीत स्वच्छता ,झाड कटिंग , रोड स्वच्छता लॉन्स देखरेख इतर पाण्याच्या सुविधा ,बुद्ध विहाराची स्वच्छता ,आदी चांगल्या प्रकारात राबवण्यात आल्याचेही राठोड यांनी सांगितले .एकोणावीस सुरक्षा कर्मचारी ,10 आरोग्य, गार्डन विभागाचे 17 व इतर स्वच्छालयाची स्वच्छता करणारे चार कर्मचारी या ठिकाणी चांगल्या प्रकारचे काम करत असल्याने व परिसरात नियंत्रण असल्याने आलेल्या पर्यटकांना दादासाहेब फाळके स्मारक बघायला मिळत आहे दोन दिवसांपूर्वी फक्त कारंजे सुरू झाल्याची माहिती मिळत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com