अ‍ॅक्युपंक्चर केंद्रावर ज्येष्ठांंची गर्दी

अ‍ॅक्युपंक्चर केंद्रावर ज्येष्ठांंची गर्दी

सातपूर | प्रतिनिधी | Satpur

रायगड प्रतिष्ठानचे (Raigad Foundation) संस्थापक समाधान देवरे व वैशाली देवरे यांच्या वतीने नागरिकांसाठी कायमस्वरूपी मोफत अ‍ॅक्युपंक्चर उपचार केंद्र (Free acupuncture treatment center) सुरू करण्यात आले. या केंद्रावर परिसरातील ज्येष्ठ नागरीकांची (Senior citizens) मोठी गर्दी उसळलेली आहे.

कोणत्याही औषधाविना शरीराला उपचार करणार्‍या या आधुनिक यंत्रणांच्या (Modern system) माध्यमातून मोफत असलेल्या उपचार केंद्राचे उद्घाटन प. पू. श्री अनेकरूपी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. मानवसेवा हीच ईश्वरसेवा समजून रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक समाधान देवरे नागरिकांसाठी अनेक सामाजिक उपक्रम (Social activities) राबवीत असतात. या वर्षाच्या सुरुवातीला त्यांनी नागरिकांसाठी कायमस्वरूपी मोफत अ‍ॅक्युपंक्चर उपचार (acupuncture treatment) केंद्र सुरू करण्यात आले.

या उपचार केंद्रात नैसर्गिक पद्धतीने उपचार बरे होतात. यामध्ये मॅग्नेट थेरपी, फूट मसाजर, सेराजेम सेंटर, कांस्य थाळी मशीन, बॅक मसाजर अशा विविध यंत्रणांच्या माध्यमातून शरिराच्या विविध भागांना मोफत उपचार केले जाणार आहेत. या मोफत उपचार केंद्राची पाहणी अनेकरूपी महाराज यांनी केली. त्यानंतर भाविकांनी अनेकरूपी महाराजांचे दर्शन घेतले. या सेवांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समाधान देवरे व वैशाली देवरे यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com