
त्र्यंबकेश्वर । Trimbakeshwar
सध्या सुट्ट्यांमुळे सर्व देवस्थाने हाऊसफुल्ल होत असून त्र्यंबकेश्वर देवस्थानही (Trimbakeshwar Devasthan) यात मागे नसल्याचे दिसत आहे...
येथील मंदिरात दोन महिन्यांपासून शनिवार ते सोमवार अशी तीन दिवस भाविकांची (devotees) प्रचंड गर्दी होत असून येथील जुन्या आखाड्यापर्यंत सकाळी पाच ते रात्री आठ वाजेपर्यंत भाविकांची सतत रांग असल्याचे दिसत आहे.
तसेच कालपासून नवीन दर्शनबारी पावसाच्या वातावरणामुळे (Rain weather) भाविकांना मोकळी केल्याने बाहेर असणारी रांग आत गर्दी करत आहे. तर या दर्शन बारीचे बरेचसे काम बाकी असले तरी सध्या भाविकांची सोय करण्यात आली आहे.
तर याठिकाणी विशिष्ट पदाधिकारी, राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते व विविध शासकीय अधिकारी यांचाही मोठा राबता सतत असतो. त्यांच्यासाठी देखील दर्शनाची स्वतंत्र व्यवस्था ट्रस्ट द्वारे करण्यात येते. याशिवाय मंदिर प्रशासनाने भाविकांची धार्मिक पुजा व अभिषेकाची व्यवस्था मंडपाच्या बाहेर केली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वर देवस्थान विश्वस्तांचा (Trimbakeshwar Devasthan Trustee) आपसातील वाद मात्र चव्हाट्यावर आल्याने त्याची सर्वत्र चर्चा सुरु असून यात स्थानिक विश्वस्तांना विश्वासात न घेतल्याने आपसात संशयाचे वातावरण (Atmosphere) निर्माण झाले आहे.