छटपूजेला भाविकांचा महापूर

छटपूजेला भाविकांचा महापूर

नाशिक । प्रतिनिधी Nashik

चार दिवसांपासून सुरू असलेल्या छट मातेच्या श्रद्धेच्या उत्सवाची सांगतेची पूजा रविवारी भाविकांनी गोदावरीच्या पाण्यात उभे राहून सूर्यदेवता आणि छटी मैय्याचे स्मरण करून पूजनाला प्रारंभ करण्यासाठी मोठी गर्दी केली . सोमवारी पहाटेच्या सूर्याच्या प्रथम किरणांचे दर्शन करुन उपवासाची सांगता केली जाईल.

कार्तिक महिन्याच्या चतुर्थीपासून सुरू होणार्‍या उत्सवाची सांगता सप्तमीपर्यंत केली जाते. हा महाउत्सव 4 दिवसांचा असतो. यावेळी छटपूजा 28 ते 31 ऑक्टोबर दरम्यान होत आहे. करवंद भाजी, हरभरा डाळ आणि तांदूळ खाऊन भाविकांनी शुक्रवारी विधीवत स्नान करून छटपूजेला सुरुवात केली.

आज रविवारी सूर्यास्तापासून उत्तर भारतीय नागरिक गोदाकाठी जमले. छटपूजेसाठी महिला उसाचे चौरंग मांडून पूजा मांडली. उत्तर भारतीयांच्या विविध संस्थांनी रामकुंड परिसरात मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. रात्रभर भाविकांच्या मनोरंजनासाठी मुंबईच्या प्रिया गुरु यांच्या ग्रुपद्वारे भोजपुरी गीतांचे आयोजन करण्यात आले आहे.

उद्या सकाळी उगवत्या सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर पूजेची सांगता होणार आहे. धनराज बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून कार्यक्रम आयोजित केला आहे. आयमा अध्यक्ष निखील पांचाळ यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजभाऊ पाटील, सुभाष अग्रहारी, अयोध्या यादव, रवी सोनार, संतोष केाकाटे आदी प्रयत्नशील आहेत.या कार्यक्रमासाठी आ. सीमा हिरे, पोलिस आयुत जयंत नाईकनवरे, गुरुमीत बग्गा, पद्माकर पाटील, महंत भक्तीचरण दास, तसेच धनंजय बेळे, ललित बूब आदींच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला.

या पूजेच्या माध्यमातून भारतीयांवर कोणतेही संकट येऊ नये, जीवनात भरभराटी, उन्नती राहण्यासाठीप्रार्थना करण्यात आली. महिलांसाठी स्वतंत्र वस्त्रांतरण कक्ष उभारण्यात आलेले आहे.

- गोविंद झा, आयोजन समिती सदस्य

युपी, बिहार भागातून मोठ्या प्रमाणात सण साजरा केला जातो. येणार्‍या भाविकांसाठी आयोजन समितीने मोफत चहाची व्यवस्था केलेली आहे. सकाळी अर्घ्य देण्यासाठी गायीच्या दुधाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

- उमापती ओझा, आयोजन समिती सदस्य

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com