नाशकात लसीकरण केंद्रावर पहिल्याच दिवशी नागरिकांची गर्दी

नाशकात लसीकरण केंद्रावर पहिल्याच दिवशी नागरिकांची गर्दी

सातपूर | Satpur

नाशिक महानगर पालिकेच्या (Nashik Mahanagar palika) आरोग्य विभागातर्फे (Health Department) सातपूर महादेव नगर (Satpute Area) शाळा क्र ३३ येथे मोफत लसीकरण केंद्र (Vaccinations Center) सुरु करण्यात आले. पहिल्याच दिवशी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

सातपूर व गाव परिसरातील जनसामान्यांच्या सोयीसाठी हे केंद्र सुरू करण्यात आले असून या केंद्राच्या सुरू करण्यासाठी नितीन निगळ यांनी पाठपूरावा केला होता. लसीकरण केंद्र सुरु झाल्यामुळे महादेव नगर जनसेवक समिती व रहीवाशांनी आभार मानले.

लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी नितिन निगळ, विजय अहिरे, संजय तायडे, भारत भालेराव, अरुण काळे, जिवन रायते, सुनिल गुंजाळ आदींसह सातपुर गावातील तरुण प्रयत्नशिल होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com