घोटी बाजारपेठेत नागरिकांची तोबा गर्दी

रस्त्यावर गर्दीने फुलला बाजार
घोटी बाजारपेठेत नागरिकांची तोबा गर्दी


घोटी | Ghoti

जिल्ह्यात निर्बंध शिथिल झाल्यानंतर पहिल्याच दिवशी खरेदीसाठी नागरिकांनी घोटी शहरात गर्दी केली होती. भाजी मार्केट, इलेक्ट्रिक दुकाने, किराणा दुकाने, हार्डवेअर, बी बियाणे खते आदी दुकानात हाऊसफुल गर्दी दिसत होती. यावेळी सोशल डिस्टनिनिचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसत होते.

तसेच रस्त्यावर ही वाहनांची माणसांची एकच गर्दी दिसत होती निर्बंध शिथिल होताच नागरिकांना कोरोना गेल्या असेच जणू काही वाटत होते. विशेष म्हणजे 40 टक्के लोकांच्या तोंडावर साधे मास्क सुद्धा दिसत नसल्याचे चित्र घोटी शहरात बघायला मिळाले.

जिल्ह्यात 'ब्रेक द चेन'अंतर्गत निर्बंधांत शिथिलता आणल्‍याने गेल्‍या अनेक महिन्‍यांपासून बंद असलेली दुकाने मंगळवारी उघडल्यानंतर पहिल्‍याच दिवशी खरेदीसाठी नागरीकांनी बाजरपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी केल्‍याचे चित्र होते. लॉकडाउन अंशंत: शिथील करण्यात येताच ग्रामीण भागाची मुख्य बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या घोटी बाजार पेठेत मुख्य रस्त्यावर गर्दीने रस्ते फुलले होते.


पाऊस जवळ येऊन ठेपल्याने नागरिकांनी भात, खते, किराणा आदी वस्तू घेण्यासाठी आज गर्दी केली होती. शेतकऱ्यांची बियाणे खरेदी करता नागरिकांमुळे मुख्य रस्त्यावर गर्दीत वाढ झाली होती वाढती गर्दी पाहून पोलीस व ग्रामपालिका कर्मचारी फिरत होते. मात्र या गर्दीत करोनाच्या सूचनांचे पालन करतांना मास्क वापरतांना काही नागरिक दिसून आले तर काहींनी मास्क फक्त शो साठी आणले होते, का असा प्रश्न निर्माण होत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com