येवल्यातील बाजारात गर्दी

येवल्यातील बाजारात गर्दी

येवला । प्रतिनिधी

शहरात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १४ दिवसापूर्वी जिल्हा लॉक डाऊन करण्यात आला होता. मात्र लॉक डाऊनचे नियम शिथिल होताच येवलेकरांनी बाजारात एकच गर्दी खेली आहे. या मुळे करोना प्रादुर्भावाची तुटलेली शृंखला पुन्हा जोडली जाते की काय असा सवाल उपस्थित होत आहे.

पालिका प्रशासनाने मेनरोड, शनी पटांगण या भागात भरणारा बाजार बंद करून इतरत्र हलवला. मात्र विक्रेत्यांनी येवला - कोपरगाव रस्त्यावर येवला बस स्थानक ते फत्तेबुरुज नाका असे अंदाजे एक किलोमीटर पर्यंत रस्त्यावरच दुकाने थाटल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला.

या गर्दीने सामाजिक अंतराचाही फज्जा उडाला. तर शनी पटांगण, मेनरोड, आदी भागातही विक्रेत्यांनी दुकाने थाटल्याने सर्वत्रच गर्दी दिसत होती. गेल्या दोन दिवसांपासून बाजारात अभूतपूर्व गर्दी होत आहे. गत महिन्यात येवले शहरासह तालुकाभर करोना प्रादुर्भाव झाला होता. बहुतेक गावातून करोनाचे रुग्ण सापडत होते. शहरातील सर्वच दवाखाने करोना बाधित रुग्णांनी खचाखच भरले होते.

ना. भुजबळांनी जिल्ह्यात लॉक डाऊन केल्यानंतर गत पंधरा दिवसापासून करोना बाधित रुगणांचा आलेख खाली आला आहे. दवाखान्यातील करोना बाधित रुगणांची गर्दीही कमी झाली आहे. आता कुठेही बेड उपलब्ध होत असल्याने नागरिकही बिनघोर झाले आहेत. त्यामुळेच आता बाजारात गर्दी वाढण्यास सुरुवात झाली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com