PhotoGallery : नाशिककरांच करायचं काय?

मुख्य बाजारातील गर्दी कमी होईना ! शिवभोजनसाठी रांगा
PhotoGallery : नाशिककरांच करायचं काय?

नाशिक | Nashik

एकीकडे करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना अद्यापही नाशिकच्या रस्त्यावर नागरिकांची गर्दी दिसून येते आहे.

अंशतः लॉकडाऊन लावूनही नाशिकच्या संख्येत भर पडत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी मिळून जनता कर्फ्युचे आवाहन केले होते परंतु त्यासही नाशिक करांनी हरताळ फासल्याचे आजही दिसून आले.

शहरातील शालिमार, आर के परिसरात आजही गर्दी दिसून आली. विशेषतः शिवभोजन थाळी केंद्रावर भलीमोठी रांग लागल्याचे दिसून आले.

त्यामुळे नाशिककर घरी थांबून प्रशासनाला सहकार्य करणार का? एवढी भयावह परिस्थिती असताना देखील नाशिककर घराबाहेर पडत आहेत. यावर कठोर नियम लावल्याशिवाय गत्यतर नसल्याचे दिसून येत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com