पिंपळगाव खांब आरोग्य केंद्रावर लसीकरणासाठी गर्दी

सुविधांची कमतरता
पिंपळगाव खांब आरोग्य केंद्रावर लसीकरणासाठी गर्दी

नवीन नाशिक | Nashik

पाथर्डी परिसरात असलेल्या पिंपळगाव खांब येथे आरोग्य केंद्रा वरती लस घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे.

वाढत्या गर्दीला नियंत्रणात आणण्यात आरोग्य कर्मचारी अपयशी ठरत असून त्यासाठी पोलिस बंदोबस्ताची मागणी करण्यात येत आहे. तर उपलब्ध लसीचा साठाही वाढवून देवून परिसरात आणखी दुसरे लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष सोमनाथ बोराडे यांनी केली आहे.

सध्या कोरोनाचे रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने लसीकरण करून घेण्यासाठी रहिवाशांनी मिळेल त्या ठिकाणी लस घेण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. त्यातच खाजगी रुग्णालयांमध्ये लसीकरण केंद्रे बंद झाल्याने मनपा आरोग्य केंद्रांवर गर्दी वाढू लागली आहे.

पिंपळगाव खांब येथे असलेल्या आरोग्य केंद्रावर सकाळपासूनच परिसरातील व नवीन नाशिक परिसरातील ही रहिवाशी येऊ लागल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे. याठिकाणी लसीकरण करून घेण्यासाठी आलेल्यांना सोयी सुविधा मिळत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. तर अनेक ४५ वर्षावरील वरील महिला- पुरुषही लशीकरण करून घेण्यासाठी येत असल्याने त्यांना बसण्याची सुविधा ,पिण्यासाठी चे पाणी व सनी टायझर उपलब्ध करून द्यावेत तसेच रहिवाशांमध्ये होणारे शाब्दिक वादावादी थांबवण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्याची गरज असल्याचे मत सोमनाथ बोराडे यांनी केले आहे.

वाढत्या संख्येला आलेल्या लसीचे डोस पूर्ण होत नसल्याने काहींना रिकाम्या हाती परतावे लागत असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आरोग्य केंद्रावर राँका चे सोमनाथ बोराडे व त्यांचे सहकारी मदत करीत आहेत. केंद्रावर नियंत्रण व लसीकरण करून घेण्यासाठी आरोग्य कर्मचारी सुनिता सोनवणे, शारदा बोरसे, मीना कांदळकर, प्रिया जाधव, शिवकांता कुंडेकर, प्रतिभा गावित, विजयपोरजे, प्रकाश करपे, आयुष शर्मा लक्ष देत आहेत.

वाढत्या गर्दी वर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस बंदोबस्त द्यावा. तसेच आरोग्य केंद्राकडून लसीकरण करून घेण्यासाठी आलेल्यांना सुविधा मिळाव्यात. लसीचे डोस वाढवून देण्यात यावे. परिसरात आणखी दुसरे लसीकरण केंद्र सुरू करण्यात यावे . आरोग्य कर्मचारी वाढवावेत व लसीकरणाचा वेगही वाढवावा

- सोमनाथ बोराडे, राँका देवळाली विधानसभा अध्यक्ष

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com