ओझर आरोग्य केंद्रावर लसीकरणासाठी गर्दी

ओझर आरोग्य केंद्रावर लसीकरणासाठी गर्दी

ओझर । Ojhar

येथील आरोग्य केंद्र हे लसीकरणासाठी तोबा गर्दी होत असल्याने सोशल डिस्टनसिंग चा फज्जा उडत आहे.

पोलीस प्रशासन, नगरपरिषद आणि आरोग्य केंद्राच्या नियोजन शून्य आणि ढिसाळ व्यवस्थापनामुळे करोनाच्या हॉट स्पॉट ठरलेल्या ओझरला याचा अजून जास्त प्रमाणात फटका बसत आहे. तसेच हॉस्पिटलच्या आवारात राहणाऱ्या नागरिकांना सुद्धा याचा मोठ्या प्रमाणात त्रास होऊन त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

मुख्य म्हणजे ओझर नगरपरिषद व हॉस्पिटल यांनी समन्वय साधून योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. लसीकरण हे यात्रा होत असलेल्या मैदानावर होत असल्याने गर्दी होताना दिसून येत आहे. त्यामुळे लसीकरण मैदानावर न होता उपकेंद्रात व्हायला हवे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com