Photogallery : नवीन नाशिक येथील भाजी बाजारात गर्दी

वाहतूक कोंडीसह सोशल डिस्टंसिंग फज्जा
Photogallery : नवीन नाशिक येथील भाजी बाजारात गर्दी

नवीन नाशिक | Nashik

नवीन नाशकातील शिवाजी चौक शॉपींग सेंटर येथील भाजी मार्केटमध्ये ग्राहकांनी गर्दी केल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडीसह सोशल डिस्टंसिंग फज्जा देखील उडाला.

मनपा व पोलिस प्रशासनाच्या वतीने सध्या नवीन नाशिक परिसरामधील भाजी बाजार परिसरात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर तसेच भाजीविक्रेत्यांवर कारवाई सुरू आहे. दरम्यान शिवाजी चौक शॉपींग सेंटर येथे दररोज सकाळी भल्या मोठ्या प्रमाणावर भरल्या जाणाऱ्या भाजी बाजारामध्ये मात्र सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसत आहे.

लेखानगर ते शॉपिंग सेंटर दरम्यान च्या मुख्य रस्त्यावर देखील भाजीविक्रेते बसलेले असतात. बरेच ग्राहक हे रस्त्यावरून जात असताना आपले वाहन रस्त्यात उभे करूनच भाजी खरेदी करण्यासाठी थांबत असल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडीचा प्रश्न गेल्या कित्येक दिवसांपासून भेडसावत आहे.

सध्या करोना विषाणू च्या दुसऱ्या लाटेमध्ये नाशकात बधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना भाजी बाजारातच शेकडोंच्या संख्येने नागरिक एकत्रित आल्याने करोना चा संसर्ग वाढण्याची भीती नवीन नाशिककरांनी व्यक्त केली आहे.

पोलीस प्रशासनातर्फे नवीन नाशकातील पवन नगर व त्रिमूर्ती चौक भाजी बाजार येथे कुपन पद्धती चालू करून या ठिकाणी एक तासाच्या आत नागरिकांना भाजी खरेदी करून बाहेर पडावे लागत आहे. मात्र शिवाजी चौक शॉपींग सेंटर येथील भाजी बाजार हा नवीन नाशकातील सर्वात मोठा भाजी बाजार असल्याने या ठिकाणी उपाययोजना अद्याप न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com