मध्यरात्रीच सातपूरकर येऊन बसताय  लसीकरणासाठी

मध्यरात्रीच सातपूरकर येऊन बसताय लसीकरणासाठी

सातपूर | प्रतिनिधी | Satpur

लसीअभावी बंद असलेल्या शिवाजीनगर केंद्रावर (Shivajinagar Vaccination Center) लसीकरणाला प्रारंभ झाला. लसीकरण (Vaccination) होणार अशी माहिती मिळाल्यावर नागरिकांनी या केंद्रावर रात्रीपासूनच गर्दी (Crowd) केल्याचे दिसून आले...

मागील पाच ते सहा दिवसांपासून लसीकरण बंद होते. मात्र शहरातील बहुतांश ठिकाणी लसीकरण पुन्हा सुरु झाल्याने नागरिकांनी मोठी गर्दी केली. सातपूर गावातील पीएसआय रुग्णालयात (PSI Hospital) त्र्यंबक रोडवरील प्रवेशद्वारापर्यंत नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र होते.

संभाव्य तिसरी लाट येण्यापूर्वी सर्वत्र लसीकरण व्हावे हे शासनाचे धोरण आहे. नागरिकदेखील त्यासाठी उत्साहाने सहभाग घेत आहेत. मध्यंतरी पडलेल्या खंडामुळे काही केंद्रांवर लसीकरणासाठी मोठी झुंबड उडाली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com