पांडवलेणी, फाळके स्मारक परिसरात गर्दी

मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांची संख्या वाढली
पांडवलेणी, फाळके स्मारक परिसरात गर्दी

नवीन नाशिक । Nashik

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून संचारबंदी सुरू करण्यात आली असून विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उचलला जात आहे, मात्र मुंबई महामार्गालगत व नाशिकच्या प्रवेशद्वारावर असलेल्या पांडवलेणी, फाळके स्मारक परिसरात दररोज सकाळी तसेच सायंकाळी व्यायामासाठी तसेच निसर्गरम्य वातावरण बघण्यासाठी शेकडो नागरिक याठिकाणी येऊन गर्दी करत संचारबंदी नियमांचे उल्लंघन करताना दिसून येत आहे.

जगभरात थैमान घालणाऱ्या करोना महामारीला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अत्यावश्यक कामाशिवाय विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर पोलीस व मनपा प्रशासनाकडून कारवाई केली जात आहे. पांडवलेणी फाळके स्मारक परिसरात आपले आरोग्य सुदृढ व निरोगी राहावे यासाठी सकाळी तसेच सायंकाळी पाच वाजेपासून नागरिक व्यायामासाठी तसेच निसर्गरम्य वातावरण, बघण्यासाठी, ट्रॅकिंग करण्यासाठीं याठिकाणी नागरिकांची गर्दी दिसून येते.

विशेष म्हणजे लहान बालकांचा ही या ठिकाणी समावेश असतो. विशेष म्हणजे यात सायकल, दुचाकी, चारचाकी आणि पाई चालत येणाऱ्यांची संख्या मोठी असते, यामुळे परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून येत असल्याने संसर्ग वाढण्याची भीती आहे.

या ठिकाणी होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी काही दिवसांपूर्वी इंदिरानगर पोलिसांनी पहाटे ४ वाजेपासून बंदोबस्त करत येथे येणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा बडगा उचलला होता. यानंतर या परिसरात नागरिकांनी येण्यास टाळले होते. मात्र पुन्हा पोलिसांची कारवाई थंडावल्याने तसेच या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा बंदोबस नसल्याने पुन्हा व्यायाम प्रेमींची शेकडोंच्या संख्यने गर्दी होताना दिसून येत आहे.

येथे येणारे अनेक नागरिक मास्क परिधान न करणे सोशल डिस्टंसिंग न पाळणे याप्रकारे करोणा नियमांचे उल्लंघन केले जात आहे. करोणाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पांडवलेणी फाळके स्मारक येथे येणाऱ्या नागरिकांवर कारवाई करणे गरजेचे असल्याचे जागृत नागरिकांचे म्हणणे आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com