लॉकडाऊन काळातही कोट्यवधीची कामे

भगूरचा चेहरामोहरा बदलणार कोट्यवधी
लॉकडाऊन काळातही कोट्यवधीची कामे

देवळाली कॅम्प । वार्ताहर Devlali Camp

करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळातही भगूर शहरातील विविध प्रभागांत सुमारे पाच कोटी रुपयांची कामे पालिकेच्या वतीने चालू असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानासाठी आजपर्यंत १५ कोटींचे काम होत आले असून त्यातील एक कोटींचा नदीच्या बाजूला बैठक गॅलरी स्लॅब नुकताच झाला आहे. तर सोनवणे मिल ते क्रांती चौक या सुभाषरोड रस्त्याचे साधारण ३५ लाख रुपयांचे काँक्रिटीकरण झाले असून शिवाजी महाराज चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर डेली मार्केटचे अंदाजे ३ कोटी ५० लाखांचे काम प्रगतिपथावर आहे. तर देशमुख वाड्यातील चार लाखांचे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील जलकुंभ कंपाऊंड भिंतीचे तीन लाखांच्या कामास लवकरच सुरुवात होणार आहे.

याशिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील मुख्य दलित वस्तीमधील तीन मोठ्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणसह अंडर ग्राऊंड पाईपलाईनचे सुमारे ५० लाखांचे काम पूर्ण झाले असून सध्या तरी शहरात एकूण पाच कोटींची विकासकामे दोन महिन्यांत पूर्ण होऊन पुढील राहिलेल्या भगूर खत प्रकल्प ते आठवडे बाजार रोडचे ५५ लाखांच्या विकासकामाची सुरुवात लवकरच होणार असल्याचे नगरपालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, ही सर्व विकासकामे करण्यासाठी भगूर नगराध्यक्षा अनिता करंजकर, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, नगरसेवक आर. डी साळवे, शाम ढगे, कविता यादव, प्रतिभा घुमरे यांच्या विशेष प्रयत्नाने तसेच पालिका मुख्याधिकारी प्रतिभा पाटील व मुख्य लिपिक रमेश राठोड, बांधकाम अभियंता रमेश कांगणे यांचे सहकार्य मिळत आहे. या विकासकामांमुळे शहराचा चेहरामोहरा बदलत असल्याने कैलास यादव, काकासाहेब देशमुख, संजय बलकवडे, प्रमोद घुमरे, अजय वाहणे, सुनील साळवे, प्रदीप साळवे, विक्रम गायकवाड आदी नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com