खडांगळी पाणी योजनेसाठी कोटींचा निधी

पाणी पुरवठा
पाणी पुरवठा

वडांगळी । वार्ताहर | Vadangali

जलजीवन मिशन योजनेतून (jaljeevan mission) तालुक्यातील खडांगळी गावच्या पाणीपुरवठा योजनेसाठी (Water supply scheme) राज्य शासनाच्या (state government) पाणीपुरवठा विभागाकडून (Water Supply Department) 1 कोटी 23 लाखांचा निधी (fund) मंजूर झाला आहे.

खडांगळीच्या गावठाणचे विस्तारीकरण होत आहे. शिवाय शिवारात लोकवस्ती करुन राहणार्‍या ग्रामस्थांची संख्या मोठी आहे. प्रत्येक घरापर्यंत पिण्याच्या पाण्याचा नळ पोहोचून या सर्व लोकांची तहान भागविणे आवश्यक आहेे. शासनाच्या जलजीवन योजनेत खडांगळी गावचा समावेश करण्याची मागणी आमदार माणिकराव कोकाटे (mla manikrao kokate) यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते सतीश कोकाटे (Social activist Satish Kokate) यांच्या नेतृत्वाखाली सरपंच शीला कोकाटे,

तत्कालीन उपसरपंच आशा ठोक, उपसरपंच रंगनाथ कोकाटे, सागर कोकाटे, शरद कोकाटे, कल्पना नवनाथ ठोक यांनी केली होती. ग्रामपंचायत पदाधिकारी व सेवकांनी यासाठी वाडी-वस्तीवर फिरुन सर्वेक्षण करुन घेतले. जिल्हा परिषदेने लोकसंख्येच्या मानाने खर्च जास्त असल्याने प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता. आ. कोकाटे यांनी राज्य शासनाकडे योजना मंजुरीसाठी पाठपुरावा केला.

त्यांच्या प्रयत्नातून खडांगळी ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा योजनेस नुकतीच मंजुरी मिळाली असून एक कोटी 23 लाख 34 रुपयांचा निधी त्यासाठी मंजूर झाला आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या योजनेच्या कामास लवकरच सुरुवात होणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com