अवकाळी पावसाचा पिकांना फटका; द्राक्ष उत्पादक चिंतेत

अवकाळी पावसाचा पिकांना फटका; द्राक्ष उत्पादक चिंतेत

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

नाशिक शहर (nashik city) व जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाचा (Unseasonal rain) द्राक्ष, रांगडा (लेट खरीप) कांदा, गहू ,हरभरा या पिकांना (crop) फटका बसणार असल्यामुळे विशेषतः द्राक्ष उत्पादकांमध्ये (Grape growers) नाराजी दिसून येत आहे.

या पावसामुळे (rain) सर्वाधिक फटका हा द्राक्ष बागांना बसणार आहे. ज्या द्राक्ष बागा (Vineyards) अर्ली आहेत, त्या द्राक्षमन्याना या पावसाचा फटका बसून मनी तडकण्याची भीती व्यक्त होत आहे. अर्ली द्राक्ष ही 25 डिसेंबरच्या दरम्यान कंटेनरमधून निर्यात होतात. या द्राक्षांची काढणी सध्या सुरू आहे

या द्राक्षाला सध्या प्रति किलो 100 ते 110 रुपये असा भाव मिळत असून या द्राक्षमण्यांना पावसाचा फटका बसल्यास हे द्राक्ष मणी तडकण्याची भीती आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांमध्ये (grape growers) नाराजी आहे. या पावसामुळे द्राक्ष पिकास फंगस (fungus) येण्याची शक्यता अधिक आहे.

रांगडा कांद्याची काढणीही काही भागात सुरू असून काही ठिकाणी लागवडीचे काम सुरू आहे. या कांद्यालाही करपा रोगाचा प्रादुर्भाव या पावसामुळे होण्याची शक्यता आहे. तसेच गहू व हरभरा या पिकांवरही पावसामुळे (rain) माव्याचा प्रादुर्भाव होईल. कांदा, द्राक्ष, गहू, हरभरा या पिकांना आता पाऊस व वातावरण असेच राहिले तर औषध फवारणीचा खर्च वाढणार आहे.

पावसाचे प्रमाण व वातावरण असेच राहिल्यास व थंडीचे (cold) प्रमाण वाढल्यास द्राक्ष बागांमध्ये शेकोट्या कराव्या. ज्या द्राक्षबागांमध्ये पावसाचे पाणी साचल्यास तेथील पाण्याचा निचरा होईल या पद्धतीने पाणी काढून द्यावे, असा सल्ला जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषी अधिकारी रमेश शिंदे (Ramesh Shinde, District Agriculture Officer of Zilha Parishad) यांनी दिला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com