त्र्यंबकेश्वर : पीक विम्याचे कवच शेतकऱ्यांसाठी लाभदायक

तालुका कृषी विभागाचे आवाहन!
त्र्यंबकेश्वर : पीक विम्याचे कवच शेतकऱ्यांसाठी लाभदायक
त्र्यंबकेश्वर

वेळुंजे | देवचंद महाले

सध्या पावसाच्या लहरीपणामुळे हतबल झालेला शेतकरी वर्ग, चांगलाच धास्तावला असून वेगाने फोफावनाऱ्या शेतीवरील रोग व किडीमुळे प्रत्येक प्रसंगाला त्याला पर्याय शोधणे अतिशय जिकरीचे मार्ग काढूनही,निराशाच माथी पडत आहे.

यावर उपाय व शेतकऱ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी आता त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कृषी विभागाने कंबर कसली असून कृषी विभागाचे अधिकारी अता प्रत्येक गावात व खेड्यात जाऊन तेथील ग्रामपंचयातीशी संपर्क साधून व शेतकऱ्यांचे समूह गट तयार करून प्रधान मंत्री पिक विमा योजनेची माहिती देऊन शेतकरी वर्गाला अभय देण्याचे काम करीत आहेत.

मागील वर्षी यात ३४८० शेतकरी यांनी सहभाग नोंदवून ३५५८१क्षेत्र -१५५२ हेक्टर क्षेत्राचे तालुक्यातील १२५ गावातील शेतकऱ्यांनी लाभ घेतला होता.

तर या वर्षी सन २०२०-२१ या वर्षाचे उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेऊन प्रधान मंत्री पीक विमा योजनेची जास्तीत जास्त अंमलबजावणी व्हावी, यासाठी आता तात्काळ ग्रामपंचायत मधील संगणक ऑपरेटर यांच्याशी समन्वय साधून पीक विमा भरण्यासाठी शेतकरी वर्गाची सुलभ व्यवस्था करण्यात आली आहे.

हंगामी वर्षात खरीप हंगामातील पिकांची लागवड ही वीस जुलै अखेरीस सत्तर टक्के झाली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पेरणीचे क्षेत्र २५३३५ हेक्टर इतके असून भात ११६३४ हेक्टर, वरई ३२४१ हेक्टर, ५३९४१ हेक्टर, उडीद १४४१ हेक्टर, भुईमूग १०७० हेक्टर, खुरासणी ९९१ हेक्टर वरती लागवड झाली असून यातच पाऊसाची सतत हुलकावणी व करपलेली शेती भात अन्य पिकांवरती लागलीच रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने या साठी तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी प्रधान मंत्री पीक विमा योजनेचा फायदा घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रधान मंत्री पीक विमा योजनेसाठी शेतकऱ्यांना लागणारे दस्तवेज आधार कार्ड, बँक पास बुक, पीक पेरा अहवाल, जमिनीचा ७/१२, जमिनीचा ८अ. इत्यादी कागदपत्रे लागणार असून भात पिकासाठी हेक्टरी फक्त ९१० रुपये व नागली साठी ४०० रुपये विम्याची आकारणी करण्यात आली आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख ३१ जुलै २०२० पर्यंत असून शेतकऱ्यांनी नजीकच्या राष्ट्रीयीकृत बँक, आपले सरकार सेवा केंद्र किंवा स्थानिक पातळीवर ग्रामसेवक, तलाठी, कृषि सहायक यांच्याशी संपर्क साधावा, असे कृषी विभागाकडून अहवान करण्यात आले आहे.

सध्या शेतकरी हा अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून जात आहे. भात, नागली पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक बळ देणें महत्वाचे आहे. ही योजना भात, नागली पीक घेणाऱ्या अधिसूचित, क्षेत्रातील शेतकऱ्यांना ऐच्छिक असून यात कुळाने अगर भाडे पट्टीने शेती करणारे शेतकरी पात्र ठरतील.

- तालुका कृषी अधिकारी त्र्यंबकेश्वर

प्रधान मंत्री पीक विमा योजनेचा २०२०-२१ अंतर्गत मोजे कोणे, वाघेरे, वेळे तालुक्यातील अन्य ग्रामपंचायती मध्ये सुविधा करून देण्यात आली असून, त्यासाठी कृषी सहाय्यक, नीलिमा ठुबे, कृषी पर्यवेक्षक, संजय पाटील अन्य कृषी विभागाचे कर्मचारी गावा गावात जाऊन माहिती देत आहेत.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com