अवकाळीमुळे जिल्ह्यातील 'इतक्या' द्राक्षबागा उध्वस्त

अवकाळीमुळे जिल्ह्यातील 'इतक्या' द्राक्षबागा उध्वस्त
प्रातिनिधिक फोटो

नाशिक | प्रतिनिधी

जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे (Nonseasonal Rain) १८ हेक्टवरील द्राक्षबागांचे नुकसान झाले आहे. (Grapes farm damaged due to rain) कळवण तालुक्यातील (Kalwan Taluka) बागांना या पावसाचा फटका बसल्याचे दिसून येत आहे. पावसाळ्याचा हंगाम संपून साडे तीन महिने उलटले असूनही अवकाळीने हजेरी लावल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे....

हंगामी पावसाने मुक्काम हलविला असला तरी अवकाळी पाऊस मात्र अधूनमधून जिल्ह्यात हजेरी लावून शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका चूकवितोच आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी काही तालुक्यांत पावसाने हजेरी लावली. यानंतर ११ जानेवारी रोजीदेखील कळवण तालुक्यात पावसाने शेतकऱ्यांची धांदल उडविली.

अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. (Nashik Collector order about crop damaged review) त्यानुसार १५ तालुक्यांपैकी निफाड (Niphad), सटाणा (Satana), चांदवड (Chandwad), कळवण (Kalwan), इगतपुरी (Igatpuri), दिंडोरी (Dindori) या तालूक्यांत ११ जानेवारीला अवकाळी पावसाने हजेरी लावली.

परंतु, कळवण तालुक्यातील सहा गावांमध्ये अवकाळी पावसाने धुडगूस घातला. या गावांमधील एकूण २१ शेतकऱ्यांच्या १८ हेक्टरवरील द्राक्षबागेचे नुकसान झाले आहे. नुकसान भरपाई मिळावी अशी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com