मुसळधार पावसाने कांदा, मका, बाजरी जमीनदोस्त

मुसळधार पावसाने कांदा, मका, बाजरी जमीनदोस्त

चिचोंडी | वार्ताहर Chichondi

येवला तालुक्यातील (Yeola) पश्चिम भागातील चिचोंडी (Chichondi) परिसरात सोमवारपासून सुरू झालेल्या हस्त नक्षत्रातील परतीच्या पावसाने हाहाकार माजवला. ढगफुटी सदृश्य पाऊस याठिकाणी कोसळला...

पंचक्रोशीत मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहू लागले आहे. तसेच चिचोंडी (Chichondi) परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने अगस्ती नदिवरील मातीचा बंधारा फुटला. यामुळे बाजरी मका सोयाबीन कांदा टमाटो अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

शेकडो एकर क्षेत्रात कांदा पिकांत साचलेल्या अतीपाण्यामुळे कांद्याच्या मुळ्या खराब होत आहे. पश्चिम भागातील अंगणगाव (Angangaon), रायते (Rayate), पारेगाव (Paregaon), बदापुर (Badapur) ,निमगाव मढ (Nimgaon Madh), महालखेडा (Mahalkheda), भिंगारे (Bhingare), साताळी (Satale), एरंडगाव (Erandgaon), जळगाव नेऊर (Jalgaon Neur), पुरणगाव (purangaon) या भागात मुसळधार वादळी पाऊस झाला.

या पावसामुळे परिसरातील नदी नाले ओढ्याना पाणी आले. शेतामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने कांदा लागवडदेखील अनेक ठिकाणी सुरू आहे. मात्र, या पावसाचा कांदा रोपांना मोठ्या प्रमाणात फटका बसू लागला आहे.

कोवळ्या रोपाचे सडण्याचे प्रमाण वाढले आहे. .लागवड झालेल्या कांद्यावर देखील नव्याने आलेल्या टीळे नावाचा रोग पसरू लागला आहे.

यामुळे कांदापात वाकडी (Crop Damaged) होत असल्याने त्याचा थेट परिणाम कांदा वाढ खुटण्यावर होत आहे. साहजिकच प्रारंभीची पाणी टंचाई तर आता पाऊस पुढील रब्बी हंगामासाठी लाभदायक ठरणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आणि खुशी असा दुहेरी माहोल दिसू लागला आहे.

Related Stories

No stories found.