पीकनुकसान भरपाई मिळावी : राजोळे

पीकनुकसान भरपाई मिळावी : राजोळे

निफाड । प्रतिनिधी Niphad

तालुक्यातील द्राक्ष उत्पादक (Grape growers) शेतकर्‍यांना (farmers) मागील महिन्यात अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान सहन करावे लागले. शासनाने शेतकर्‍यांच्या मागणीनुसार नुकसानीची टक्केवारी लावून घाईगडबडीत व एका दिवसात पंचनामे (panchanama) उरकून शेतकर्‍यांना शांत करण्याचे काम मागील महिन्यात केले.

त्यामुळे अवकाळी पावसामुळे (Untimely rain) झालेल्या नुकसानीपोटी शेतकर्‍यांना एकरी एक लाख रुपये देण्यात यावे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (swabhimani shetkari sanghatna) तालुका अध्यक्ष राम राजोळे (ram rajole) यांनी निवासी जिल्हाधिकारी डोईफोडे (Resident Collector Doiphode) यांचेकडे निवेदनाद्वारे (memorandum) केली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आधीच शेतकरी व द्राक्ष उत्पादक अडचणीतून मार्गक्रमण करीत आहे. त्याच औषधे व खतांचे भाव गगनाला भिडले आहे. मजुरी मागेल तितकी द्यावी लागते. वर्षभर द्राक्षबागा सांभाळाव्या लागतात. अशा वेळी अवकाळी पावसामुळे द्राक्षबागांचे नुकसान झाले तर शेतकरी कर्जबाजारी होतो.

सध्या तीच परिस्थिती शेतकर्‍यांची झाली आहे. बँका शेतकर्‍यांच्या दारात येत आहे. अवकाळीमुळे व्यापार्‍यांची मनमाणी वाढल्याने शेतकरी उद्धवस्त झाला आहे. शासन घोषणा करते परंतु अंमलबजावणी होत नसल्याने सदरच्या योजना शेतकर्‍यापर्यंत पोहचत नाही. त्यामुळे अवकाळीने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना एकरी एक लाख रुपयांची मदत मिळावी अशी मागणीही स्वाभिमानीचे राम राजोळे यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com