ग्रा.पं. पदाधिकार्‍यांकडून पीक नुकसान पाहणी

ग्रा.पं. पदाधिकार्‍यांकडून पीक नुकसान पाहणी

कोठुरे । वार्ताहर | Kothure

मागील चार दिवसांपासून संपूर्ण नाशिक जिल्ह्यासह (nashik distict) कोठुरे व परिसरात जोरदार पावसामुळे (heavy rain) गोदावरी नदीला (godavari river) पूर आला आहे. गोदावरी नदीवरील निफाड (niphad) व सिन्नर (sinnar) तालुक्याला जोडणारा कोठुरे-करंजगाव पूल हा पाण्याखाली गेला असून या पुलाला पूर्णपणे पानवेलीने वेढा दिला आहे.

पानवेलीमुळे पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी व गावाजवळ पुराचे पाणी गेल्याने वाहतुकीसाठी पूल बंद करण्यात आला असून परिसरातील नदीकाठची पीके पाण्याखाली गेली आहे. तर अतिवृष्टीमुळे (heavy rain) इतर पिकांमध्ये पाणी साचले आहे. या पीक नुकसानीसह (Crop damage) पूरपरिस्थितीची (flood) पाहणी ग्रामसेविका व ग्रा.पं. पदाधिकार्‍यांनी केली आहे.

यावर्षी प्रथमच गोदावरी नदीला जुलैच्या सुरवातीला मोठा पूर आला आहे. मागील आठवड्यात झालेल्या संततधारेमुळे मोठ्या प्रमाणात सोयाबीन (Soybean) व मका (Maize) पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत. मात्र सोयाबीन व मका पीक उतरण्याच्या अवस्थेत असताना शेतात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबल्याने या पेरण्या वाया जातात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अगोदरच शेतकर्‍यांनी महागडी सोयाबीन व मका बियाण्यांची पेरणी केली आहे.

शेतकरी (farmers) कर्जबाजारी असताना जोरदार पावसाने पेरण्या वाया जाणार असून शेतकर्‍यांना दुबार पेरण्या कराव्या लागणार आहे. यामुळे शेतकर्‍यांची चिंता अधिकच वाढली आहे. यावेळी ग्रा.पं. च्या ग्रामसेविका दिघे, सरपंच जयश्री मोगल, ग्रा.पं. सदस्य, कर्मचारी आदींसह ग्रामस्थांनी पूर परिस्थितीची पाहणी केली. गोदाकाठचा पूर पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. महसूल विभागाने पीक नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावे अशी मागणी होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com