मका
मका
नाशिक

नांदगाव : पावसामुळे खरीप पिकांचे नुकसान

ज्वारी, मका, बाजरी, पिकांवर परिणाम

Gokul Pawar

Gokul Pawar

नांदगाव | Nandgoan

नांदगाव तालुक्यातील टाकळी, बाणगांव, खिर्डी दहेगांव, मोरझर या भागात गुरुवारी रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे खरीपाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

नांदगाव तालुक्यातील टाकळी, बाणगांव, खिर्डी, दहेगांव मोरझर, माणिपुंज, पोखरी व परिसरात गुरुवारी (दि.२३) रात्री वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने खरीपाचे ज्वारी, मका, बाजरी, पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. या नुकसानग्रस्त पिकांचे ताबडतोब कृषी विभाग व महसूल विभागाने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी वाल्मिक निकम, ज्ञानेश्वर गायकवाड, शंकर गायकवाड, इंदूबाई अशोक, सजन कवडे आदी शेतकऱ्यांनी केली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com