मुसळधार पावसाने पिकांचे नुकसान

मुसळधार पावसाने पिकांचे नुकसान

सटाणा | प्रतिनिधी Satana

तालुक्यातील पश्‍चिम आदिवासी परिसरात मुसळधार पाऊस Heavy Rain व सुसाट्याच्या वाऱ्यामुळे या भागातील सोयाबीन बाजरी नागली व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान crop damages झाले आहे.

बारीपाडा, वग्रीपाडा, वाठोडा घुरमाळ, साळवण, केळझर गारमाळ, सुळबारी आदी गावांत महसूल व कृषी विभागाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी सटाणा कृउबा संचालक तुकाराम देशमुख, बागलाण पंचायत समितीचे माजी सदस्य सोमनाथ सूर्यवंशी, भावराव ठाकरे, तुकाराम ठाकरे, नाना महाले यांनी केली आहे .

गेल्या काही दिवसापासून अवकाळी पावसामुळे शेतीत पेरलेले सोयाबीन पीक पूर्णता वाया गेले असून काल पडलेल्या पावसामुळे शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आहे.

बागलाण तालुक्यात पश्चिम पट्ट्यात अवकाळी पावसामुळे शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असल्याने या भागातील लोकप्रतिनिधींनी आजी-माजी आमदारांनी जिल्हा परिषद सदस्यांनी तात्काळ पाहणी करून या शेतकऱ्यांना शासनाकडून भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

सर्वत्र पावसामुळे जनजीवन विस्कळीत होत असतांना तालुक्यातील कौतिकपाडे, भाक्षी, मुळाणे, वायगाव, चौगाव, कऱ्हे, रातीर, कोळीपाडा, दोधेश्वर, रातीर आदी गावांमध्ये पावसाने दडी मारली आहे. परिसरातील पाझर तलावात पाणी नसून, शेतकरी ट्रँकरने पाणी उपलब्ध करीत असल्याची माहिती कृउबा संचालक केशव मांडवडे, जिभाऊ मोरकर यांनी दिली.

Related Stories

No stories found.