परीक्षा न देताही कसे पास झाले? असे प्रश्न तुम्हालाही विचारत असतील तर हे वाचा

परीक्षा न देताही कसे पास झाले? असे प्रश्न तुम्हालाही विचारत असतील तर हे वाचा
File Photo

नवीन नाशिक | वार्ताहर Nashik

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education) घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीचा निकाल (10th Result) ऑनलाईन पद्धतीने नुकताच घोषित झाला. मात्र, एकही दिवस शाळेत न जाता घरबसल्या अभ्यासकरून आपण चांगल्या गुणांनी पास झाल्याचे माहितीअसतानाही अनेकांना अजून निकाल पाहता आलेले नाहीत...'कही ख़ुशी कही गम' असलेल्या विद्यार्थ्यांचा प्रयत्न सध्या वेबसाईट लॉग करण्याकडे दिसून येत आहे...

दुसरीकडे अनेकजन शाळेत न जाता, बोर्डाच्या (Board Examination) परीक्षेला न बसता हा बहाद्दर पास कसा झाला या प्रश्नाचे उत्तर मागू पाहत आहेत. अनेक ठिकाणी अशा गमतीशीर चर्चांना उधान आले आहे.

शैक्षणिक वर्ष जून 20 ते जुलै 21 पर्यंत कोरोनाविषाणूच्या (Covid 19) पार्श्वभूमीवर शैक्षणिक क्षेत्रात अनेक चढ- उतारांनी भरलेले होते. कोरोनामुळे शिक्षणामधील असलेल्या अनेक मोठ्या परीक्षा रद्द झाल्या. तशा त्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा ही रद्द झाल्याने विद्यार्थी परीक्षा न देताच पास झाल्याचे निश्चित झाले होते.

शैक्षणिक इतिहासात परीक्षां न देता पास होण्याची बहुदा ही विद्यार्थ्यांसाठी पहिलीच वेळ असावी. शालेय स्तरावर दहावीच्या विचार करता परीक्षा न देताच शासनस्तरावरून ठरवण्यात आलेल्या फार्मूल्या नुसार विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचा भाग इयत्ता नववीतील पन्नास टक्के गुण व इयत्ता दहावीत असलेले पन्नास टक्के गुण यानुसार निश्चित करण्यात आलेला आहे. (Criteria for 10th examination result)

परीक्षाच न झाल्यामुळे विद्यार्थ्याला कोणत्या आधारावर दहावी परीक्षा उत्तीर्ण करावे हीच परीक्षा राज्याच्या शिक्षण विभागासाठी होती. राज्याच्या शिक्षण विभागाने ही मग केंद्रातील धोरणाप्रमाणेच मूल्यांकन करीत विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला.

यावर्षी शाळेकडून एसएससी बोर्डाकडे पाठवल्या गेलेल्या गुणांवर आधारित विद्यार्थ्यांना गुणपत्रिका प्राप्त होणार आहे. दहावीत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाकडून ठरवून देण्यात आलेल्या मूल्यानुसार गुण मिळणार आहेत.

इयत्ता नववीतील पन्नास टक्के गुण गृहीत धरले म्हणजेच (अ विद्यार्थ्याला नववीच्या मराठी विषयात वार्षिक परीक्षेत 80 गुण मिळाले असतील तर त्याच्या निम्मे 40 गुण प्राप्त होतील तर दहावीतील 30 + 20 गुणा पैकी म्हणजे 50 पैकी 45 गुण मिळाले असतील तर असे दोघे मिळून 40+ 45 = 85 गुण 100 पैकी प्राप्त होतील.

असे प्रत्येक विषयातील म्हणजेच असलेल्या सहा विषयांपैकी सहाशे गुणांपैकी विद्यार्थ्याला गुण प्राप्त होणार आहेत. तर वैकल्पिक विषयांची मिळालेली श्रेणी गृहीत धरली जाणार आहे. त्यामुळे यावर्षी विद्यार्थ्याच्या टक्केवारीत मोठी वाढ दिसणार आहे, तर शाळेचा निकाल शंभर टक्के व बोर्डाचा निकाल ही शंभर टक्के लागणार असण्याची शक्यता गृहीत धरता विद्यार्थ्यांमधील गुणांची टक्केवारीची स्पर्धा आणखी तीव्र होणार आहे.

वाढलेले गुण विद्यार्थ्यांसाठी लाभदायक असले तरी पुढील अकरावीसाठी मोठी चुरस बघायला मिळणार आहे. रद्द झालेल्या परीक्षा कमजोर विद्यार्थ्यांना लाभ देऊन जातील तर हुशार विद्यार्थ्यांसाठी आव्हान निर्माण करणाऱ्या ठरतील.

शैक्षणिक इतिहासात प्रथमताच दहावी-बारावीसाठी कोरोनामुळे परीक्षा रद्द करण्याची वेळ आली आणि परीक्षा न देताच विद्यार्थी पास झाल्याची पहिली वेळ ठरावी. शैक्षणिक वर्ष 22 -23 पासून केंद्राच्या धोरणानुसार अनेक बदल होणार आहेतच प्रत्यक्ष परीक्षा देऊन परीक्षेच्या निकालाची वाट पाहणारे अनेक विद्यार्थी या आधी दिसत होते.

उत्सुकता शिगेला पोहचत होती. परंतु यावर्षी मात्र कोरोना संकटामुळे वर्षभर ताटकळत असलेल्या विद्यार्थ्याच्या शैक्षणिक जीवनात केवळ औपचारिकता म्हणूनच ही वाट व उत्सुकता दिसून येत आहे. शेवटी गुण कसे मिळालेत यापेक्षा आपण परीक्षा न देता हे उत्तीर्ण झाल्याचे मानसिक समाधान विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

तर शाळांनाही ऑफलाइन तासिका न घेताच विद्यार्थ्यांना मोठे गुण मिळून निकाल शंभर टक्के लागण्याची पावती मिळणार आहे. तर एसएससी, एचएससी बोर्डालाही परीक्षाकेंद, परीक्षा, तपासणी विद्यार्थ्यांचे गुणांकन, तोंडी परीक्षांचे गुणांकन, राखून ठेवलेले निकाल, परिक्षा नियमक मुख्य नियामक यांच्या तपासण्या या सर्व बाबी तून दिलासा विद्यार्थ्यांसह पालकांना मिळाला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com