ऐन पावसाळ्यात पाणीटंचाईचे संकट; ग्रामस्थांचा रास्ता रोको

ऐन पावसाळ्यात पाणीटंचाईचे संकट; ग्रामस्थांचा रास्ता रोको

मनमाड । प्रतिनिधी | Manmad

ऐन पावसाळ्यात (monsoon) भीषण पाणीटंचाई (Water scarcity) निर्माण झाल्यामुळे हिसवळच्या त्रस्त ग्रामस्थांनी आज (दि. 15) नांदगाव (nandgaon) - मनमाड (manmad) मार्गावार रस्ता रोको आंदोलन (agitation) केले.

गिरणा धरणावरील (girna dam) 56 खेडी पाणीपुरवठा योजनेतून (Water Supply Scheme) सुरळीत पाणीपुरवठा (Water Supply) करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. आंदोलनाची माहिती मिळताच पोलीस (police) व पाटबंधारे विभागाच्या (Department of Irrigation) अधिकार्‍यांनी आंदोलनास्थळी धाव घेत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

मनमाडपासून 14 कि.मी. अंतरावर असलेल्या हिसवळ खुर्द (Hiswal Khurd) गावाला गिरणा धरणावरील 56 खेडी योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र ही योजना बंद असल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून ग्रामस्थांना पाणीटंचाईचा (water scarcity) सामना करावा लागत आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी अनेकवेळा निवेदने (memorandum) देण्यात आली,

मात्र त्याकडे संबंधित अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आणि त्यांनी आज नांदगाव-मनमाड मार्गावर रस्ता रोको आंदोलन (agitation) केले. यावेळी ग्रामस्थांनी पाटबंधारे विभागाच्या (Department of Irrigation) अधिकार्‍यांविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनाची माहिती मिळताच पंचायत समितीचे विस्तार अधिकारी ढवळे, पाणीपुरवठा विभागाचे कापसे नांदगावचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरवाडकर (Assistant Sub-Inspector of Police Surwadkar), बोगीर, सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड (Zilha Parishad Chief Executive Officer Leena Bansod) याच मार्गाने जात असल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी त्यांची गाडी अडवून पाणीटंचाई व आंदोलनाबाबत माहिती दिली असता त्यांनी स्वत: लक्ष घालून समस्या लवकरात लवकर मार्गी लावू, असे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.

सरपंच कैलास फुलमाळी, उपसरपंच संजय आहेर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात नानासाहेब आहेर, सुदाम आहेर, बंडू आहेर, लखन आहेर, शांताराम लोखंडे, संदीप कदम, संदीप आहेर, माजी सरपंच विजय आहेर, मोहन आहेर, संजय आहेर, हिसवळ बु. सरपंच बाळू बेंडके, रवींद्र देशमुख, श्रावण भालेराव, राजेंद्र करवर यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com