अतिवृष्टीने दुबार पेरणीचे संकट

अतिवृष्टीने दुबार पेरणीचे संकट

देसराणे। वार्ताहर | Desrane

कळवण तालुक्यातील (Kalwan taluka) पुनद खोर्‍यात गेल्या चार-पाच दिवसापासुन मोठ्या प्रमाणावर पावसाची अतीवृष्टी (heavy rain) होत असुन शेती पिके (crop), रस्ते (road), पशुधनाचे नुकसान होत आहे. अनेक भागात जनजीवन विस्कळित झाले आहे.

कळवण तालुक्यासह (kalwan taluka) पुनद खोर्‍यात पावसाची संततधार सुरु असल्याने पिकांचे नुकसान होत आहे. मका (Maize), सोयाबीन (soybean), मिरची, टोमेटो, भूईमुग, बाजरी पीके अनेक ठिकाणी पाण्याखाली गेली आहेत. शेतामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. पावसामुळे ठिकठिकाणी रस्त्यांची दुरावस्था झाली असुन ग्रामीण आदिवासी भागातील (tribal area) अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. गिरणा (girna) व पुनद नद्यांना पुर आल्याचे चित्र असुन दोन्ही नद्या दुधडी भरुन वाहत आहेत.

नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने नदी काठावरील जमीनी मधील पीके भूईसपाट झाली आहे. अनेक शेतकर्‍यांच्या पीकांचे व शेतीचे नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांनी महाग बी बियाणे, खते खरेदी करून पेरणी केलेली पीके वाया जाण्याची भिती निर्माण झाली असुन शेतकर्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहनार असल्याची भीती निर्माण झाली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com