पिंपळगाव बसवंतमध्ये दहशत पसरवणाऱ्या 'लंक्या'च्या आवळल्या मुसक्या

पिंपळगाव बसवंतमध्ये दहशत पसरवणाऱ्या 'लंक्या'च्या आवळल्या मुसक्या

पिंपळगाव बसवंत | Pimpalgaon Baswant

पिंपळगाव बसवंत येथील जुना आग्रा रोडवर (Old Agra Road) हाॅटेल व मोटरसायकल जाळल्या प्रकरणी (hotel fire and bike burnt issue) आरोपी स 24 तासात अटक करण्याची कामगिरी पोलीसांनी केली....

पिंपळगाव बसवंत येथील जुना आग्रा रोडवरील चेतन कायस्थ जुन्या पध्दतीचे लाकडी इमारतीचे हाॅटेल असुन दि.25 रोजी रात्री पेटून दिले होते तसेच एक मोटर सायकल पण पेटविण्यात आली होती.

यासोबतच काही समाजकंटकांनी चार चारचाकी वाहनांच्या काचादेखील फोडल्या होत्या. परीसरातील काही दुकानांच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये (CCTV Footage) संशयित आरोपी दिसून आले. संशयित हे परिसरातीलच असल्याचे पोलिसांना लक्षात आले.

तत्पूर्वी चार दिवसापूर्वीच जि.प.शाळेतील (Zilla Parishad) टि.व्हि चोरी प्रकरणी सहा आरोपी जेरबंद केले होते या टोळीत काही महिन्यांपूर्वी आकाश संतोष अस्वले ऊर्फ लंक्या वय 21 याचा समावेश होता.

काही महिन्यांपासून हा पिंपळगाव बसवंत येथील दगडू नाना नगर (Dagadu Nana Nagar) मध्ये राहण्यास आला होता. पोलिसांनी सूत्र हालवत स.पो.नि.कुणाल सपकाळ पो.काॅ.मिथुन घोडके.संदीप दराडे यांनी आरोपी आकाश यास पाचोरे फाटा येथे सिनेस्टाईल पाठलाग करत पकडले.

यानंतर त्याला पोलीस ठाण्यात हजर केले असता पोलीसी खाक्या दाखवताच हाॅटेल व मोटरसायकल पेटवल्याचे कबुली त्याने दिली. तसेच बस स्टँड जवळील टपरी पण फोडण्याची कबुली दिली असुन याच्या बरोबरीचे दोन साथीदार असल्याचे त्याने सांगितले आहे.

अवघ्या 24 तासात आरोपी बेड्या ढोकल्या बदल समाधान व्यक्त होत असून या प्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस.निरीक्षक भाऊसाहेब पठारे, पोलीस उपनिरीक्षक कुणाल सपकाळ सह पोलीस काॅ.संदीप दराडे, मिथुन घोडके, पप्पु देवरे, रवी बारहाते. अमोल जाधव, रामदास गांगुर्डे, सागर धात्रक आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com