आमदार सिमा हिरे यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल

आमदार सिमा हिरे यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल

नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik

पवन नगर Pavan Nagar येथे एका महिलेवर झालेल्या अत्याचार प्रकरणी संशयित गुन्हेगाराला अटक करण्यात यावी या मागणीसाठी  अंबड पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करणाऱ्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार According to the Disaster Management Actअंबड पोलिस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज ( दि .28) सायंकाळी सात ते आठ वाजेच्या सुमारास पवन नगर येथे एका महिलेवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगाराला अटक करण्यात यावी या मागणीसाठी ठिय्या आंदोलन करणाऱ्या नाशिक पश्चिमच्या आमदार सिमा हिरे, भाजपा शहराध्यक्ष गिरीष पालवे, नगरसेविका छाया देवांग ,

प्रतिभा पवार , अलका अहिरे, कावेरी घुगे , मुकेश शहाणे, हर्षा फिरोदिया, जगन पाटील , शिवाजी बरके,अविनाश पाटील , राहुल गणोरे, राकेश ढोमसे , डॉ. वैभव महाले, अँड. अतुल सानप , किरण गाडे , उत्तम काळे , अमोल पाटील ,

बाळासाहेब पाटील, यांच्यासह दहा ते पंधरा महिला व पुरुष कार्यकर्त्यांवर अंबड पोलिस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com