नाशिक । प्रतिनिधी

घरमालकांनी भाडेकरूची माहिती संबधीत पोलीस ठाण्यास कळविणे क्रमप्राप्त असतांना माहिती लपविणार्या एकाच इमारतीतील तीन घरमालकांविरूध्द सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.

अविनाश खर्चे (रा.ठाणे),रमेश इंगळे व सचिन शहा (रा. विद्याविकास सर्क ल) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयीत घरमालकांची नावे आहेत. संशयीतांचे लोटस हॉस्पिटल परिसरातील आर्चित विहार या सोसायटीत सदनिका असून त्या भाडेतत्वावर देण्यात आले आहेत.

शहरात परजिल्हा आणि परप्रांतीय गुन्हेगारांचे वास्तव्य चर्चेत आल्यानंतर शहर पोलीसांनी संबधीत पोलीस ठाण्यात भाडेकरूची नोंद करणे अनिवार्य केले आहे. त्यानुसार संशयीतांनी आपल्या भाडेकरूची माहिती पोलिसांना कळविणे गरजेचे असतांना माहिती लपविण्यात आली.

सरकारवाडा पोलिसांनी याची खातरजमा केली असता ही बाब उघडकीस आली. संशयीतांच्या घरात गेल्या तीन ते चार वर्षापासून भाडेकरू राहत असतांना माहिती दडविण्यात आल्याने एकाच इमारतीत सदनिका असणार्या तीन घरमालकांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी हवालदार मुक्तेसिंग राजपूत यांनी तक्रार दाखल केली असून अधिक तपास पोलीस नाईक आहिरे आणि भोये करीत आहेत.