समता परिषदेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा

समता परिषदेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा

नाशिक | Nashik

ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करत वाहतूकीस अडथळा आणल्याप्रकरणी तसेच कोविड संसर्गाचा प्रादुर्भाव असताना हयगयीची घातक कृती केल्याप्रकरणी महात्मा फुले समता परिषदेच्या पदाधिकार्‍यांसह शंभराहून अधिक कार्यकर्त्यांविरुद्ध मुंबई नाका पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी गुरुवारी द्वारका चौकात पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी ठिय्या मारत रास्ता रोको आंदोलन केले होते.

पोलिस नाईक राजेंद्र देवरे यांनी दिलेल्या तक्रारीन्वये, समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब कर्डक, जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे, शहराध्यक्ष संतोष सोनपसारे, कार्याध्यक्ष समाधान जेजूरकर यांच्यासह 100 ते 125 कार्यकर्त्यांविरुद्ध जमावबंदी तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com