सिन्नर : अपघात करुन पळालेल्या चालकावर गुन्हा
नाशिक

सिन्नर : अपघात करुन पळालेल्या चालकावर गुन्हा

सिन्नर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Vilas Patil

Vilas Patil

सिन्नर । Sinner

सिन्नर-पुणा महामार्गाच्या वळण रस्त्यावर सिल्व्हर पब्लिक स्कुलसमोर मोटार सायकलला पाठीमागून ठोस देवून पळून गेलेल्या मोटार सायकल चालकाच्या विरोधात सिन्नर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

नाशिक येथील रामपूरत उर्फ राजू लोकवा प्रजापती रा. म्हाडा कॉलनी, पंचवटी नाशिक हा हिरो ड्युट मोटार सायकल (क्र. एम.एच.15/एफ.जी. 8658) ने (दि.२९ जुलै) रोजी सायंकाळी 7.30 च्या दरम्यान नाशिककडे जात असताना त्याने पुढे चालणाऱ्या बजाज सिटी 100 मोटार सायकल (क्र. एम.एच.15/बी. आर. 4083) ला धडक दिली होती.

त्यात पुढील मोटार सायकलवरील प्रविण बाळासाहेब बोडके रा. सोनगिरी हा जखमी झाला होता. मोटार सायकल मागे बसलेला विकी बाळू लहाने (20) रा. सोनगिरी गंभीर जखमी होवून नंतर त्याचा मृत्यू झाला होता.

या अपघातानंतर प्रजापती कुठलीही खबर न देता पळून गेला होता. बोडके यांच्या तक्रारीनंतर पोलीसांनी प्रजापतीचा शोध घेऊन विकीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल व गुन्ह्यानंतर खबर न देता पळून गेल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश परदेशी करीत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com