
नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad
बंगल्याच्या खिडकीची जाळी कापून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून कपाटातील सुमारे दोन लाख 14 हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने व काही रोख रक्कम चोरून नेल्याचा प्रकार वडनेर दुमाला येथे घडला असून याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात सुषमा प्रेमचंद केवट राहणार सर्वे नंबर 207 पंपिंग स्टेशन वडनेर दुमाला नाशिक रोड यांनी उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे त्यात म्हटले आहे की अज्ञात चोरट्याने आपल्या बंगल्याच्या खिडकीची जाळी कापून घरात प्रवेश केला व कपाटातील सोन्याची पोत चैन अंगठी व काही रोख रक्कम मिळून असा सुमारे दोन लाख 14 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला असेही तक्रारीत म्हटले आहे.
या तक्रारीनुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे.