पेठच्या ‘त्या’ युवकांवर गुन्हा दाखल

पेठच्या ‘त्या’ युवकांवर गुन्हा दाखल

पेठ । प्रतिनिधी | Peth

तालुक्यातील मसणविहीरा (Masanvihira) येथील 16 वर्षीय मुलीस गावातीलच दोन 19 वर्षीय मुले माझे बरोबरच लग्न (marriage) कर अन्यथा आम्ही जिव देऊ यासाठी दबाब आणत असल्याने मंजुषा भुसारे (16) या मुलीने विषारी औषध (Toxic drug) सेवन केले.

तिला तातडीने नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात (District Government Hospital, Nashik) उपचारासाठी दाखलं करण्यात आले. विषाने प्रभाव दाखविलेला असल्याने उपचारा दरम्यान मंजुषाचा मृत्यु झाला.

मयताची आई उषा मधूकर भुसारे यांच्या फिर्यादी वरुन यशवंत वार्डे (19) व किशोर भोये (19) दोघेही रा. मसणविहरा ता. पेठ यांच्या विरुद्ध भादवि कलम 305, 34 अन्वये गुन्ह्याची नोंद (Crime record) करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक के. एम. कपिले व हवालदार जव्हेरी करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com