हरसूलच्या वैद्यकीय अधिकाऱ्याला शिवीगाळ

सहा जणांविरुद्ध गुन्हा
हरसूलच्या वैद्यकीय अधिकाऱ्याला शिवीगाळ

नाशिक । Nashik

त्र्यंबक तालुक्यातील हरसूल येथील आरोग्य केंद्रात दाखल होण्यासाठी आलेल्या कोरोनाबाधित रुग्णास घेण्यास नकार दिल्याने याचा राग येऊन सहा जणांनी येथील वैद्यकीय अधिकारी ठोंबरे यांस शिवीगाळ व दमदाटी केली. याप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्र्यंबक तालुक्यातील सारस्ते येथील एक कोरोना बाधित रुग्ण हरसूल येथील आरोग्य केंद्रात तपासणीसाठी आला असता, त्याला त्र्यंबकेश्वरच्या रुग्णालयात दाखल करू घेण्यासाठी चिठ्ठी लिहून दिली. त्याचवेळी रुग्णाने कोणाला तरी फोन लावून दिला. परंतु सदर रुग्ण कोरोना बाधित असल्याने डॉक्टरांनी घेण्यास नकार दिला. त्यामुळे वाद उद्भवल्यानंतर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com