नाशकातील सहा घंटागाडी कर्मचार्‍यांवर गुन्हे

शिवीगाळ व दमबाजी केल्याप्रकरणी
घंटागाडी
घंटागाडी

नाशिक | Nashik

मागण्यांसाठी अचानक कचरा गोळा करण्याचे काम बंद करून आंदोलन करणार्‍या तसेच स्वच्छता निरिक्षकांना शिवीगाळ व दमबाजी केल्या प्रकरणी ६ घंटागाडी कर्मचार्‍यांवर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महादेव दगुजी खुडे (नारायणबापुनगर, जेलरोड), शिवनाथ दगडु जाधव, विठ्ठल नामदेव शिंदे, जयेंद्र दगडु पाडमुख, सुभाष संभाजी गवारे, नितीन बाळु शिराळ अशी गुन्हा दाखल झालेल्या कर्मचार्‍यांची नावे आहेत.

याप्रकरणी स्वच्छता निरिक्षक दिपक चव्हाण यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार करोनाची साथ सुरू असल्याने शहरातील कचरा संकलन करणे अत्यावश्यक आहे.

असे असतानाही घंटागाडी कर्मचार्‍यांना ठेकेदाराकडून मास्क, सॅनिटायझर तसेच इतर सुविधा मिळत नसल्याच्या कारणातून पंचवटी विभागातील सुमारे २३० घंटागाडी कर्मचार्‍यांनी अचानक शुक्रवारी दुपारी कामबंद आंदोलन केले. स्वच्छता निरिक्षक त्यांना समजाऊन सांगत असताना त्यांना शिवीगाळ व दमबाजी केली तसेच ठेकेदारालाही दमबाजी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यता आला आहे. अधिक तपास उपनिरिक्षक बिडगर करत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com