नाशिकरोड : फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

नाशिकरोड : फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

नाशिकरोड | Nashik road

गुंतवणूकदारांची एक कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने हा गुन्हा आर्थिक गुन्हा शाखेकडे देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

फिर्यादी आशुतोष पंढरीनाथ आढाव (49, कर्नल, ऑफिसर कॉलनी, गोस्वामी एनक्लेव्ह, आर्टिलरी सेंटर, नाशिकरोड) यांनी संशयित अरविंद ग्यानशंकर सिंग (42, कृष्णवंदन रो हाऊस, गुलमोहर कॉलनी, आर्टिलरी सेंटररोड), राजेशकुमार विजयकुमार सिंग (38, प्लाट नं. 58, साईश्रध्दा अपार्टमेन्ट, लोखंडेमळा, जेलरोड) यांच्याविरुध्द फिर्यादी दिली आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपींनी संगनमत करुन फिर्यादी व गुंतवणुकदारांना फ्युचर ट्रेडिंग सोल्युशन या कंपनीबाबत खोटी माहिती देऊन फिर्यादी व इतर गुंतवणूकदारांकडून विविध रकमा स्वीकारल्या.

त्या बदल्यात फिर्यादी व त्यांच्या सहका-यांना सामंजस्य करार आणि सिक्युरिटी चेक्स देण्यात आले. मात्र, करारनाम्याप्रमाणे परतावा दिला नाही.

फिर्यादी व त्यांच्या सहका-यांनी फ्युचर ट्रेडिंग सोल्युशन या फर्ममध्ये गुंतवणूक केलेली असताना परताव्यापोटी फ्युचर फोरच्युन या नवीन फर्मचा चेक देऊन फसवणूक केली. आजपर्यंत फिर्यादी व इतर गुंतवणुकदारांचा एक कोटी पाच लाख 75 हजार रकमेचा अपहार केला. हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून ज्यांची फसवणूक झाली असेल त्यांनी नाशिक शहर आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा असे तपासी अधिकारी सहाय्यक निरीक्षक केदार यांनी कळवले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com