क्रिकेट प्रशिक्षकांसाठी मार्गदर्शन

क्रिकेट प्रशिक्षकांसाठी मार्गदर्शन

नाशिक | Nashik

नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन (Nashik District Cricket Association), सगळ्या संलग्न विद्यमान कार्यरत तसेच इच्छुक भावी क्रिकेट पंचांसाठी (Cricket Umpires) मोफत विशेष मार्गदर्शन शिबिर आयोजित करीत आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन वर्षभर साधारण पाचशे पेक्षा जास्ती सामन्यांचे आयोजन करीत असते...

या सामन्यांत नाशिक शहरामधीलच अनेक जण पंच म्हणुन कामगिरी करीत असतातच. या सर्व विद्यमान पंचांच्या कौशल्यात वाढ होऊन, नवीन अद्ययावत क्रिकेट नियमांची माहिती व्हावी, त्याविषयीचे सर्व शंकांनिरसन व्हावे या दृष्टीने आणि खासकरुन ज्या खेळाडू वा क्रिकेट (Cricket) प्रेमींना भविष्यात क्रिकेट पंच म्हणून भूमिका पार पाडण्यात रस आहे, अशा सर्वांसाठी विशेष क्रिकेट पंच मार्गदर्शन शिबिराचे नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन एनडीसीएतर्फे (NDCA) नियोजन करण्यात आले आहे.

मुळचे नाशिकचे बीसीसीआयचे (BCCI) पंच संदीप चव्हाण या शिबिरात खास मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्यासोबत नाशिकचेच एमसीए लेव्हल वन पंच प्रणव कुलकर्णी व अजय गुजर देखील असणार आहेत. हे शिबिर शनिवार दि. १८ सप्टेंबर रोजी सकाळी ९:३० ते ५:०० या वेळेत महात्मानगर क्रिकेट मैदान हॉल येथे होणार आहे.

शिबिरात सहभागी होऊन मार्गदर्शन घेतल्यास नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या सामन्यांत पंच म्हणून संधी मिळणार आहे. सर्व सहभागी पंचांना प्रमाणपत्रदेखील मिळणार आहे.

जिल्ह्यातील सर्व इच्छुक खेळाडू (Players) व क्रिकेट प्रेमी उमेदवारांकरिता, क्रिकेट पंच होण्यासाठी हे शिबिर म्हणजे सुवर्णसंधी आहे. सर्वांनी याचा निश्चित लाभ घ्यावा, असे आवाहन नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे करण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com