
घोटी | प्रतिनिधी | Ghoti
इगतपुरी तालुक्यातील (Igatpuri Taluka) उंबरकोण गावामध्ये (Umbarkon Village) स्मशानभूमीत (Cemetery) जायला रस्ता (Road) नसल्याने गावातील घरासमोर अंत्यविधी करण्याची वेळ एका कुटुंबियांवर आल्याची घटना समोर आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, घटनेबाबत अधिक माहिती अशी की, उंबरकोण गावातील ध्रुपदाबाई चंदर सारुक्ते यांचा रविवार (दि.२०) रोजी मृत्यू (Death) झाला. मात्र, स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता स्थानिक शेतकऱ्याने (Farmer) बंद केल्याने अंत्यविधीचा खोळंबा झाला होता.
त्यावेळी मुसळधार पाऊस (Road)सुरु होता. यावेळी मृतदेहची अहवेलना होत असल्याने ध्रुपदाबाई सारुक्ते यांच्या कुटुंबियांना अखेर राहत्या घरासमोर अंत्यविधी करावा लागला. यावेळी मयत सारुक्ते यांच्या कुटुंबियांनी सरपंच व सदस्य यांना दोषी धरत आता तरी रस्ता मोकळा करा असो टाहो फोडला होता.
दरम्यान, स्मशानभूमीच्या आजूबाजूला शेती असल्याने शेतकऱ्यांने जो रस्ता बंद केला आहे तो रस्ता प्रशासनाने तात्काळ मोकळा करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून (Villagers) करण्यात आली आहे.