
नाशिक । प्रतिनिधी Nashik
36 वर्षांपूर्वी बांधकाम व्यवसायिकांच्या समस्या सोडवण्यासाठी स्थापन झालेली क्रेडाई आज बांधकाम व्यवसायिकांच्या सर्वांगीण विकासासोबतच शहराचा विकास व समाजकारण करणारी संस्था म्हणून नावारूपाला आली आहे. नाशिकमध्ये रुजलेल्या या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले असल्याचे प्रतिपादन क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील यांनी केले.
'क्रेडाई'च्या 36 व्या वर्धापन दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी पाटील बोलत होते. क्रेडाई नाशिक मेट्रो तर्फे जनकल्याण रक्तपेढीच्या सहकार्याने आयोजित या रक्तदान शिबिरात 100 हून अधिक बाटल्या रक्त जमा करण्यात आले.यावेळी राष्ट्रीय क्रेडाईच्या घटना समितीचे प्रमुख जितूभाई ठक्कर, राष्ट्रीय क्रेडाईच्या रियल इस्टेट अॅकेडमीचे प्रमुख अनंत राजेगावकर, महाराष्ट्र क्रेडाईचे उपाध्यक्ष सुनील कोतवाल, माजी अध्यक्ष सुरेश अप्पा पाटील, उमेश वानखेडे, संस्थापक सदस्य डी.जे. हंसवानी आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
'क्रेडाई' ही आज देशात एक जबाबदार संस्था म्हणून ओळखली जात असून नुकतीच क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया तर्फे क्वालिटी सिटी म्हणून नाशिकची निवड करण्यात आली आहे. या प्रक्रियेत क्रेडाई नाशिक मेट्रोची मोलाची भूमिका असल्याचे राष्ट्रीय क्रेडाईच्या घटना समितीचे प्रमुख जितूभाई ठक्कर यांनी नमूद केले. याप्रसंगी महाराष्ट्र क्रेडाई चे उपाध्यक्ष सुनील कोतवाल, माजी अध्यक्ष सुरेश अप्पा पाटील, उमेश वानखेडे यांनी देखील मार्गदर्शन केले. शंभरहून अधिक वेळेस रक्तदान करणार्या सुयोग कुलकर्णी यांचा याप्रसंगी गौरव करण्यात आला.'कोण करू शकते रक्तदान?' या विषयावर क्रेडाई जनजागृती करीत आहे.
सूत्रसंचालन सहसचिव नरेंद्र कुलकर्णी यांनी, तर आभार सी. एस. आर कमिटीचे प्रमुख निरंजन शहा यांनी मानले. शिबिर यशस्वी होण्यासाठी सहसचिव सचिन बागड, ऋषिकेश कोते, कमिटी सदस्य अतुल शिंदे,सचिन चव्हाण, नितीन पाटील, श्यामकुमार साबळे, अनंत ठाकरे, विजय चव्हाणके, निशीत अटल, शुभम राजेगावकर, अर्चना पेखळे, व जनकल्याण रक्तपेढीचे अध्यक्ष राजेश रत्नपारखी, प्रशासकीय अधिकारी विनय शौचे, डॉ मिलिंद राठी, जनसंपर्क अधिकारी अरुण कुलकर्णी व प्रदिप देशमुख यांनी विशेष परिश्रम घेतले.