क्रेडाई नाशिक मेट्रोचा ‘डिजिटल प्रॉपर्टी एक्स्पो’
नाशिक

क्रेडाई नाशिक मेट्रोचा ‘डिजिटल प्रॉपर्टी एक्स्पो’

प्रॉपर्टी प्रदर्शनाचे ऑनलाईन उद्घाटन

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जगातील कोणत्याही कोपर्‍यातून नाशिकमध्ये स्वतःचे घर घेणे आता शक्य होणार आहे. त्यासाठी क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे ‘डिजिटल प्रॉपर्टी एक्स्पो’चे आयोजन करण्यात आले आहे.

क्रेडाई नाशिकच्या निवासी व व्यावसायिक प्रकल्प, रहिवासी व औद्योगिक प्लॉट, फार्म हाऊस तथा शेतजमिनी असे ८० पेक्षा जास्त बांधकाम व्यावसायिकांचे ४०० हून अधिक पर्याय जगापुढे सादर केले आहे. या ऑनलाइन प्रॉपर्टी प्रदर्शनाचे ऑनलाईन उद्घाटन क्रेडाई नॅशनलचे चेअरमन अक्षय शाह यांच्या हस्ते करण्यात आले.

नाशिकमधील अपरिमित संधींची माहिती विषद करणारी एक फिल्मदेखील या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आली असून ज्यामुळे नाशिक बाहेरील गुंतवणूकदारांना नाशिकमध्ये रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.

या प्रॉपर्टी एक्स्पोची जबाबदारी क्रेडाई युथ विंग सांभाळत असून गेली तीन महिने सतत परिश्रम करून ही आंतरराष्ट्रीय दर्जाची वेबसाईट तयार करण्यात आली आहे. www.credainashik.com या मायक्रो वेबसाईटचा प्रचार व प्रसार देशभरासह अमेरिका, इंग्लंड, दुबई, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया व हाँगकाँग या देशात करण्यात येणार आहे.

या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन अध्यक्ष रवी महाजन तसेच क्रेडाई राष्ट्रीय सल्लागार जितूभाई ठक्कर, राष्ट्रीयचे कोषाध्यक्ष अनंत राजेगावकर, महाराष्ट्रचे सचिव सुनील कोतवाल, नाशिक मेट्रोचे माजी अध्यक्ष उमेश वानखेडे तसेच उपाध्यक्ष कृणाल पाटील, सचिव गौरव ठक्कर, कोषाध्यक्ष हितेश पोद्दार, क्रेडाई युथ विंगचे समन्वयक निशित अटल व कार्यकारिणी सदस्यांनी केले आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com