स्थिर रेडीरेकनर दरासाठी क्रेडाईचे नोंदणी महानिरीक्षकांना निवेदन

स्थिर रेडीरेकनर दरासाठी क्रेडाईचे नोंदणी महानिरीक्षकांना निवेदन

नाशिक । Nashik

बांधकाम उद्योगात (construction industry) सुसूत्रतेसाठी नोंदणी प्रक्रियेत (Registration Process) सुलभता यावी यासाठी क्रेडाईतर्फे (Credai) राज्याचे नोंदणी महानिरीक्षक (State Registration Inspector General) श्रवण हर्डीकर (Shravan Hardikar) यांना निवेदन दिले...

या निवेदनात प्रामुख्याने नाशिक शहर व ग्रामीण भागात (Nashik city & rural areas) मुद्रांक शुल्क (Stamp duty) तीन टक्क्यांनी कमी करावा. वार्षिक बाजारमूल्य (Annual market value) तक्त्यातील दर हे तीन वर्षांसाठी स्थिर ठेवण्यात यावे. तसेच नवीन दर हे दर तीन वर्षांनी जाहीर करण्यात यावेत. शासनाच्या परिपत्रकानुसार करोना कालावधीमध्ये रेडिरेकनर दरापेक्षा (Ready Reckoner rate) १० ते २० टक्के कमी दरात व्यवहार करण्याची मुभा होती. त्याच दस्तांचे अवलोकन करून त्या त्या विभागात सर्व प्रकारचे दर कमी करावे.

मुख्य रस्त्यावरून पन्नास मीटर आतील भूखंडांवरील सदनिकांना मुख्य रस्तावरील सदनिकेच्या दराच्या ३० टक्के सवलत मिळावी. सिटी सर्व्हे नंबरचा रेडिरेकनरमध्ये समाविष्ट करावा. प्लॉट समोरील रोडचा एफएसआय मुव्हेबल असल्याने त्यास टीडीआरप्रमाणे तीन टक्के मुद्रांक शुल्क आकारण्यात यावे. कमी उत्पादनासाठी तसेच परवडणार्‍या घरांसाठी पहिले घर घेणार्‍यास प्रतिज्ञापत्र देऊन मुद्रांक शुल्क रुपये १००० आकारावे अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, यावेळी क्रेडाई नाशिक अध्यक्ष रवी महाजन, माजी अध्यक्ष अनंत राजेगावकर, सुनील कोतवाल, कृणाल पाटील, अनिल आहेर यांनी महानिरीक्षक श्रवण हर्डीकर यांच्याशी विविध प्रश्नांवर चर्चा केली. तसेच यावेळी हर्डीकर यांनी सविस्तर अभ्यास करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com