२३ तारखेला 'त्या' लॉन्ग मार्चची पुनरावृत्ती; सरकारविरोधात माकप, किसान सभा आक्रमक

२३ तारखेला 'त्या' लॉन्ग मार्चची पुनरावृत्ती; सरकारविरोधात माकप, किसान सभा आक्रमक

सुरगाणा | प्रतिनिधी | Surgana

शासन (Government) राज्यातील गोरगरीब, दलित, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे, यासाठी सुरगाणा येथे माकप (Communist Party) सरपंच परिषद आयोजित करण्यात आली होती.

शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागणार आहे, अशी भावना जनमानसात जोर धरत असल्याने येणाऱ्या काळात लवकरच तीव्र आंदोलन छेडण्याचे मत माकपच्या नेत्यांकडून व्यक्त झाले.

२३ तारखेला 'त्या' लॉन्ग मार्चची पुनरावृत्ती; सरकारविरोधात माकप, किसान सभा आक्रमक
मोठी बातमी! बारावीचा पेपर फुटला, प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल

हक्काच्या वन (land) जमिनीसाठी पुनश्च २०१८ च्या लाँग मार्चची (Long March) पुनरावृत्ती करणार, असे प्रतिपादन माजी आमदार जे.पी.गावित यांनी सुरगाणा येथील माकप कार्यालयात आयोजित सुरगाणा तालुका माकप सरपंच परिषदेच्या बैठकीत केले.

हक्काच्या वन जमिनीच्या लढाईसाठी नाशिक जिल्ह्याबरोबरच राज्यातील गोरगरीब, दलित, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, कामगार, सरकारी कर्मचारी जूनी पेन्शन योजना (Pension Scheme), आरोग्य सेवा, अंगणवाडी मानधन वाढ, पोलीस पाटील मानधन वाढ, नुकसानभरपाई या प्रश्नांसाठी किसान सभा, माकपतर्फे सरकार विरोधी तीव्र आंदोलन छेडले जाणार असल्याचे एकमत या बैठकीत झाले.

२३ तारखेला 'त्या' लॉन्ग मार्चची पुनरावृत्ती; सरकारविरोधात माकप, किसान सभा आक्रमक
कविता राऊत, दत्तू भोकनळ यांसारख्या खेळाडूंना...; भुजबळांच्या लक्षवेधी सूचनेवर महाजनांचे उत्तर

या बैठकीमध्ये माजी आमदार जे. पी. गावित यांनी भाजपा, शिंदे सरकारवर जोरदार टीका केली. हे सरकार शेतक-यांना केवळ खोटी आश्वासने देत आहे, त्यामुळे येत्या २३ मार्च २०२३ रोजी मुंबईतील मंत्रालयावर पुनःश्च एकदा आरपारची लढाई करत महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना सोबत घेऊन मंत्रालयावर लाँग मार्चसह धडक मोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे. असे त्यांनी सांगितले.

यामध्ये वन जमिनीच्या प्रश्नांबरोबरच वीज, रस्ता, पाणी, आरोग्य, शिक्षण, दळणवळण, घरकुल योजना, जूनी पेन्शन योजना, वृद्धापकाळ निराधार, संजय गांधी योजने प्रश्न, कांदा, कापूस, सोयाबीन, धान शेतकरी उत्पादक मालाला भाव मिळायला हवा यासाठी मोठे आंदोलन उभारले जाणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

 यावेळी माजी आमदार जे. पी. गावित, सरपंच परिषदेचे अध्यक्ष हिरामण गावित -अलंगुण, उपाध्यक्ष सदूकी बागुल-चिकाडी, सेक्रेटरी कैलास भोये-लाडगाव, खजिनदार रोहिणी वाघेरे,किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष मोहन जाधव, कार्याध्यक्ष सावळाराम पवार यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com