
नाशिक । प्रतिनिधी | Nashik
कृतीशील ख्यातनाम विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येला आता आठ वर्ष झाले मात्र, या हत्येमागील मुख्य सूत्रधारांना अद्याप पकडण्यात आले नसल्याने, मारेकऱ्यांना त्वरित अटक करून शिक्षा करावी, या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
याप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पानसरे यांच्यावर कोल्हापूर येथे त्यांच्या घराजवळ गोळीबार करण्यात आला होता, यात त्यांच्या पत्नी उमाताई पानसरे ह्या देखील जखमी झाल्या होत्या. या घटनेला आज आठ वर्ष होत आली तरी, त्यांच्या हत्यारांना व मुख्य सूत्रधारांना अद्याप पकडण्यात आलेले नाही.
मारेकांना शिक्षा होण्यासाठी शासनाने योग्य ती पावले उचलावीत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर शहर सचिव तल्हा शेख, सहसचिव कैलास मोरे, मनोहर पगारे, सुरेश गायकवाड, पुनमचंद शिंदे, रफिक सय्यद आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.