Viral Video : फुटबॉल खेळणारी गाय कधी पहिली आहे का?

Viral Video : फुटबॉल खेळणारी गाय कधी पहिली आहे का?

नाशिक | प्रतिनिधी

मुलं फुटबॉल खेळत असतील विश्वास सर्वांचाच बसेल. पण फुटबॉलच्या मैदानात जर गाय येऊन फुटबॉल खेळत असे सांगितले तर कुणाचाही विश्वास बसणार नाही. परंतु, खरच एक गाय फुटबॉलचे मैदान गाजवते आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ भारतातला आहे मात्र कुठल्या राज्यातील असेल हे मात्र समजू शकलेले नाही....

मैदानात आल्यानंतर गाय फुटबॉलचा ताबा मिळवते. फुटबॉल घेण्यासाठी काही मुले गायीजवळ जातात मात्र, ही गाय या मुलांना तिथून पिटाळून लावते. ही गाय मुलांकडे एकटक बघून पुढच्या पायाने फुटबॉल खेळण्यास सुरुवात करते. हा प्रसंग पाहण्यासाठी मोठी गर्दी मैदानाच्या आजूबाजूला होते.

यानंतर एक मुलगा हळूच गायीच्या ताब्यातून फुटबॉलला धक्का देतो. यानंतर गाय या मुलाच्या पाठीमागे धावते. तो मुलगा थोडासा दूरवर गेल्यानंतर गायीचे प्रयत्न पुन्हा हा फुटबॉल मिळविण्यासाठी सुरु होतात.

मुले गायीला इथून तिथे तिथून दुसरीकडे असे खेळवतात. यानंतर गायीने रौद्ररूप धारण केले आणि मुलांना या मैदानातून पिटाळून लावले. अखेरीस ही गाय मुलांपासून फुटबॉलचा ताबा घेते. यानंतर गोलकीपर जिथे उभा असतो तिथे हा फुटबॉल घेऊन ती आनंदात खेळताना दिसून येते. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. अनेक ठिकाणी सध्या तो पोस्ट केला जात आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com