Video : राष्ट्रवादी महिलांनी पाठवल्या पंतप्रधानांना गोवऱ्या

Video : राष्ट्रवादी महिलांनी पाठवल्या पंतप्रधानांना गोवऱ्या

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

दिवसेंदिवस गॅस सिलेंडरच्या किमतीत भरमसाठ वाढ (Gas Price Hike) होत आहे. याचा निषेध व्यक्त करत महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे व राष्ट्रवादी महिला काँग्रेस नाशिक शहराध्यक्षा अनिता भामरे (Anita Bhamre) यांच्या नेतृत्वाखाली महिला पदाधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांना गोवऱ्या पोस्टाने भेट पाठवून आपला संताप व्यक्त केला....

गेल्या दीड वर्षापासून देशात करोनामुळे (Corona) अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या तर अनेकांचे रोजगार बुडाले. महागाईमुळे सामान्य माणसाला जीवन जगणे नकोसे झाले आहे.

महागाईचा आलेख दिवसागणिक वाढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गरिबांच्या जीवनाशी काही देणे घेणे नाही. १ जानेवारीपासून आजपर्यंत घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत तब्बल १९० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. मात्र अनुदान बंद करण्यात आले आहे.

केंद्रात भाजपचे (BJP) सरकार सत्तेत येण्याआधी १ मार्च २०१४ ला ४१० रुपयांना मिळणारे गॅस सिलेंडर आज ९०० रुपयांपर्यंत जाऊन पोहचले. यामुळे सर्व सामन्यांचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. महिलांनी वारंवार आंदोलन करूनदेखील केंद्र सरकार मात्र त्यावर कुठलाही तोडगा काढत नाही.

यावेळी पूर्व विभाग अध्यक्ष सलमा शेख, पश्चिम विभाग अध्यक्ष योगिता आहेर, पंचवटी विभाग अध्यक्ष सरीता पगारे, नासिकरोड विभाग अध्यक्ष रूपाली पठारे, शहर पदाधिकारी शाहिन शेख, सलमा शेख, भगूर शहराध्यक्षा प्रेमलता राजगुरू, ज्योती भोर, रुबीना खान, संगिता उमाप, सपना पवार,गायत्री झांजरे, लता आहिरे, दिपाली गायकवाड, मेहरुनिसा खान, आदींसह महिला उपस्थित होत्या आदी महिला उपस्थित होत्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com