कोविड योद्ध्यांना 10 टक्के वेतनवाढ द्यावी : उपमहापौर
कोविड योद्ध्यांना 10 टक्के वेतनवाढ द्यावी : उपमहापौर
नाशिक

कोविड योद्ध्यांना 10 टक्के वेतनवाढ द्यावी : उपमहापौर

मुंबई महापालिकेच्या धर्तीवर नाशिक मनपातील

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

कोविड - 19 या महामारीमध्ये 18 - 16 तास काम करणारे डॉक्टर्स, सिस्टर, वॉर्डबॉय, रुग्णवाहिका चालक, सिक्युरिटी यांना एप्रिल ते जुलै या तीन महिन्याकरिता पगाराच्या 10 टक्के वाढ देऊन त्यांचा सन्मानित करावे, अशी मागणी उपमहापौर भिकुबाई बागुल यांनी केली आहे.

शहरात गेल्या मार्च महिन्यापासून सुरू झालेल्या करोना विषाणूच्या साथीचा मोठा प्रादुर्भाव झालेला असताना महापालिका आयुक्त, सर्व डॉक्टर्स, नर्स, वॉर्डबॉय व इतर सेवक सातत्याने काम करीत आहे.

हे सर्वजण 18-16 तास काम करीत असल्याने याची दखल प्रशासनाने घ्यावीत म्हणून ही मागणी मुंबई महापालिकाच्या धर्तीवर उपमहापौरांनी आयुक्त गमे यांच्याकडे एका प्रस्तावाद्वारे केली आहे.

हा प्रस्ताव येत्या महासभेवर ठेवण्यात आला आहे. मार्च ते जुलै या काळात ज्यांचा या सेवेशी प्रत्यक्ष संबंध आहे असे सर्व सेवक वर्गाला किमान एप्रिलपासून तर जूनपर्यंत तीन महिने त्यांच्या पगाराच्या 10 टक्के इतकी वाढ मंजूर करून त्याचा लाभ त्यांना तातडीने द्यावा.

यामुळे सेवक व डॉक्टर यांचे मनोबल वाढेल. तसेच आयुक्त यांनी यात उल्लेखनीय असून शहरातील परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी ते प्रयत्न करीत आहे.

सर्व आरोग्य वैद्यकीय सेवक व डॉक्टर्स यांचे 17 दिवसाचे पगार कपात झाले असून ते ताबडतोब त्यांना इन्सेंटिव्हसह देण्यात यावेत. मुंबई महापालिकेप्रमाणे डॉक्टर्स, आरोग्य-वैद्यकीय सेेवकांना इन्सेंटिव्ह मंजूर करावा, असेही उपमहापौरांनी या प्रस्तावात म्हटले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com