नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

जिल्ह्यात करोना-कोविडचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन ग्रामीण भागात कोविड लसीकरण योग्य होते की नाही ? याची पाहणी करन्यायासाठी नाशिक जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समिती सभापती आर्कि. अश्विनी अनिल आहेर यांनी नाशिक तालुक्यातील जातेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रास सोमवारी (दि. २२) भेट देऊन पाहणी केली.

या भेटीत कोविड लसीकरण सुरक्षित अंतर ठेवून चालू असल्यानचे दिसून आले.या प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रदीप जायभावे व त्यांची टीम नागरिकांना मार्गदर्शन करून कोविड लसीकरण चालू होते.

जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे.करोना नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे,असे आवाहन सभापती अश्विनी आहेर यांनी केले.