परराज्यात वाहतूक करतांना कोविड टेस्टची सक्ती करू नये

राजेंद्र फड : नितीन गडकरींकडे मागणी
परराज्यात वाहतूक करतांना कोविड टेस्टची सक्ती करू नये

नाशिक । Nashik

देशात आणि राज्यात सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या वाहतुकदारांना परराज्यात मालवाहतूक करतांना आरटीपीसीआर कोविड टेस्टची सक्ती करण्यात येऊ नये अशी मागणी नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड यांनी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,केंदीय रस्ते वाहतूक नितीनजी गडकरी,परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात तसेच देशातील विविध राज्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. या लॉकडाऊनचे आम्ही स्वागत करतो. मात्र या लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांना अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे.

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शासनाने केलेल्या नियमावली नुसार एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी आरटीपीसीआर कोविड टेस्ट बंधनकारक केली आहे. त्यामुळे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात वाहतूक करण्यासाठी वाहतुकदारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

मुळात एका राज्यातून दुसऱ्या राज्यात मालवाहतूक करणारा चालक सर्वसामान्य कुठल्याही नागरिकांच्या संपर्कात येत नाही तो थेट माल पोहचविण्याच्या ठिकाणी जातो. त्याठिकाणी गेल्यानंतर तसेच प्रवासादरम्यान तो कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करत असतो. त्यामुळे इतर राज्यात वाहतूक करण्यासाठी वाहतूकदार चालकांना आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक करण्यात येऊ नये. तसेच महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व राज्यांच्या सीमांवर वाहनांच्या रांगा लागल्या आहे.

चालकांची पण मी मोठी गैरसोय होतेय आणि जीवनावश्यक माल पण आडकुन गेला आहे. त्यामुळे सरकारला विनंती आहे आपण आरटीपीसीआर चा आग्रह रद्द करून वाहनांना प्रवेश द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com