जिल्ह्यात सव्वा पाचशे करोनाबाधित रुग्णांवर सुरु आहेत उपचार

जिल्ह्यात सव्वा पाचशे करोनाबाधित रुग्णांवर सुरु आहेत उपचार

नाशिक । Nashik

गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरासह (Nashik City) जिल्ह्यात करोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे...

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ७१ नवे करोनाबाधित रुग्ण (Corona Patients)आढळून आले आहेत. यामध्ये नाशिक शहरातील ४३ तर ग्रामीणमधील (Rural) २७ रुग्णांचा समावेश आहे. यासोबतच मालेगाव मनपामध्ये (Malegaon NMC) एक रुग्ण करोना पॉझिटिव्ह सापडला आहे.

दरम्यान, जिल्ह्यात (District) ५१९ करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आत्तापर्यंत ८ हजार ९०२ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू (death) झाला आहे. तसेच आज दिवसभरात ८४ रुग्ण करोनामुक्त झाले. नाशिकमध्ये करोनाबाधितांची संख्या वाढलेली असल्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी तसेच लक्षणे जाणवत असल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com